Amitabh Bachchan Says he feels helpless as covid won gives health update Google
मनोरंजन

'आणि शहंशाहनी कोरोनापुढे मानली हार...'; पोस्ट करत दिली हेल्थ अपडेट

अमिताभ बच्चन यांना दुसऱ्यांदा कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या आपल्याला सगळंच असहाय्य होत असल्याचं त्यांनी ब्लॉगच्या माध्यमातून सांगितलं आहे.

प्रणाली मोरे

Amitabh Bachchan Corona Health Update: महानायक अमिताभ बच्चन यांना दुसऱ्यांदा कोरोना(Corona) झाल्याचं समोर आलं आणि त्यांचे चाहते चिंतेत पडले. बिग बी यांनी मंगळवारी(२३ ऑगस्ट) रात्री उशिरा यासंबधित ट्वीट केलं होतं. त्यानंतर ते घरातच आइसोलेशनमध्ये आहेत. महानगरपालिकेचे कर्मचारी बुधवारी त्यांचे घर सॅनिटाइज करण्यासाठी गेले होते. त्यानंतर अमिताभनी ब्लॉमधनं दुसऱ्यांदा कोरोना संक्रमित झाल्याचा परिणाम आणि अनुभव शेअर केला आहे. अमिताभ बच्चन यांनी लिहिलं आहे की,''कोव्हिड जिंकला.... '' बिग बी यांनी ट्वीटरवर देखील ट्वीट करत लिहिलं आहे,''खूप वेगात धावायचा विचार करत होतो,पण वरनं ऑर्डर आली,जिथे होतो तिथेच स्तब्ध उभा राहिलो''.(Amitabh Bachchan Says he feels helpless as covid won gives health update)

अमिताभ बच्चन याआधी २०२० मध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेत Covid-19 Positive झाले होते. त्यांच्यासोबत मुलगा अभिषेक बच्चन, सून ऐश्वर्या राय-बच्चन यांना देखील कोरोना त्यावेळी झाला होता. त्यानंतर तिघेही काही दिवस रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे की,''कोव्हिड वॅक्सीनचे दोन डोस आणि सोबत बूस्टर शॉटही मी घेतला आहे पण तरीही कोव्हिड जिंकलाच''. अमिताभ गेल्या काही दिवसांपासून कोणालाही भेटत नव्हते. सध्या ते छोट्या पडद्यावर 'कौन बनेगा करोडपती' चा १४ वा सिझन होस्ट करताना दिसत आहेत.

अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे की,''कोरोनाला दोष देऊन आता काहीच उपयोग नाही''. अमिताभ यांनी डॉक्टर्स,वैद्यकीय अधिकरी सगळ्यांचीच प्रशंसा करताना लिहिलं आहे की,''या कोरोना योद्धांचं काम आणि त्यांची जिद्द वाखाणण्याजोगी आहे''. त्यांनी पुढे लिहिलं आहे की,''सर्वांनी विज्ञानावर विश्वास ठेवायलाच हवा''.

अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगमध्ये हे मान्य केलं आहे की,ते सध्या हतबल झाले आहेत. त्यांनी लिहिलंय,''लोकांना हे आश्वासन देणं की सगळं ठीक होईल,हे सगळ्यात मोठं धैर्य आहे खरंतर''. बिग बी पुढे लिहितात,''करिअर मध्ये असे अनेक प्रसंग येतात,जेव्हा तुम्हाला सगळ्यांपासून दूर आइसोलेशनमध्ये जावेसे वाटते,पण हे शक्य होत नाही. शरीर मन आणि आइसोलेशनला म्हणजे एकांताला जणू विसरूनच गेला आहे''.

ब्लॉगच्या शेवटी अमिताभ यांनी घोषणा केली आहे की आता ते पुन्हा कोणालाही आपली हेल्थ अपडेट देणार नाहीत. पण आपल्या चाहत्यांना ते हे देखील म्हणाले आहेत की,मी बरा झालोय याविषयी नक्की चाहत्यांना अपडेट देईन. अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगमध्ये 'कौन बनेगा करोडपती'चा देखील उल्लेख केला आहे. ते शो च्या शूटिंगमध्ये गेल्या काही दिवसांपासून व्यस्त होते आणि बोललं जात आहे की यामुळेच त्यांना पुन्हा कोरोना झाला असावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Traffic: बाप्पाच्या आगमनात खड्ड्यांचे विघ्न! मार्गावर तब्बल ८०० खड्ड्यांच साम्राज्य

Pune Election: नव्या प्रभाग रचनेमुळे १६ प्रभागांमध्ये गडबड; ६४ नगरसेवकांवर थेट परिणाम; 'या' पक्षांना बसणार फटका

Pune News : पतीला अर्ध यकृत दिल, प्रत्यारोपणनंतर पत्नीसह दोघांचाही मृत्यू; पुण्यातील रुग्णालयात घटनेने खळबळ

दोन महिन्यात उजनीतून सोडले 97 TMC पाणी! उजनी धरणाचे 16 दरवाजे 3 फुटाने उघडले; भीमा नदीतील विसर्ग 45 हजार क्युसेक, पंढरीतील पूरस्थिती आज पूर्वपदावर

Mumbai News: पावसाची पुन्हा विश्रांती पण मुंबईकरांना दिलासा, सातही धरणात ९५ टक्के पाणीसाठा; पाहा आकडेवारी

SCROLL FOR NEXT