मनोरंजन

समीर चौघुलेंसमोर आदराने झुकले अमिताभ बच्चन; पहा खास फोटो

स्वाती वेमूल

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' maharashtrachi hasya jatra या कार्यक्रमातील कलाकारांनी नुकतंच 'कौन बनेगा करोडपती १३'च्या KBC13 सेटवर हजेरी लावली. यावेळी या कलाकारांनी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन Amitabh Bachchan यांची ग्रेट भेट घेतली. प्रसाद ओक, समीर चौघुले Samir Choughule या कलाकारांनी भेटीदरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत अविस्मरणीय अनुभव सांगितला. त्यातही समीर चौघुलेंसाठी ही भेट अत्यंत खास ठरली होती. कारण यावेळी खुद्द बिग बी हे चौघुलेंसमोर आदराने झुकले होते. सेटवर बिग बींना पाहिल्यानंतर 'मला तुमच्या पाया पडायचे आहे', अशी विनंती चौघुलेंनी त्यांच्याकडे केली. त्यावर बिग बी त्यांना म्हणाले, 'तुम्ही माझ्या पाया नका पडू. उलट मीच तुमच्या पाया पडतो.' असं म्हणत असताना बिग बी आदराने त्यांच्यासमोर झुकले.

बिग बींच्या भेटीचा खास क्षण-

या भेटीचे काही फोटो पोस्ट करत समीर चौघुलेंनी खास आठवण सांगितली. 'तो क्षण.. आयुष्यभर काळजाच्या कुपीत साठवून ठेवण्याचा, मेंदूत त्या क्षणाची पर्मनंट 'एफडी' करून ठेवण्याचा. खूप वेळ भारावून जाण्याचा तो क्षण आपल्या आयुष्यात एकदा तरी येतोच हे काल सिद्ध झालं. काल सोनी मराठीचे हेड अजयजी भालवणकर आणि आमचे मित्र आणि सोनी मराठीचे नॉन फिक्शन हेड अमित फाळके यांच्या सहयोगामुळे आम्हा कलाकारांचे स्वप्न पूर्ण झालं. महानायक अमिताभ बच्चन यांची प्रत्यक्ष भेट झाली आणि ही भेट आमच्या महाराष्ट्राची हास्यजत्रेमुळे झाली याचं आम्हाला सर्वांनाच अत्यंतिक समाधान आहे. बच्चनसर हास्यजत्रा नियमित बघतात आणि खूप एन्जॉय करतात हे त्यांच्याकडून ऐकणं हे केवळ स्वप्नवत होतं. बच्चनसर समोर असूनही दिसत नव्हते. कारण डोळ्यात साचलेल्या आसवांनी दृष्टीला थिजवलं होतं. आसवंही वेडी ‘वाहणं’ हा गुणधर्म विसरून साचून बघत राहिली होती. पण इवलेसे कान मात्र नदीचं पात्र होऊन ऐकत होते. बच्चनसर २५ मिनिटे बोलले फक्त हास्यजत्रेबद्दल "आप सब ये कैसे कर पाते हो? एक मिनिट मे इतना बडा लाफ्टर क्रिएट करना..बहुत बढीया.. आप सब कमाल हो” हे असले संवाद बच्चन सरांकडून ऐकणं हे अविश्वसनीय नाही का हो?', अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.

जंजीरला मानतो जुळा भाऊ-

जंजीर या चित्रपटाच्या आठवणींविषयी त्यांनी पुढे लिहिलं, 'मी 'जंजीर' या चित्रपटाला माझा जुळा भाऊ मानतो. कारण त्याचा ही जन्म १९७३चा आणि माझा ही १९७३चा. आम्ही अनेक वर्षे एकत्र सुखाने एकाच शरीरात जगतोय. पण आम्हा दोघांमध्ये एक फरक आहे. मी स्वभावाने खूप मिळमिळीत आणि बोथट आहे आणि हा भाऊ मात्र खूप टोकदार आहे. हा एवढ्या वर्षात इतका आत रुतलाय की तो आता बाहेर काढणं अशक्य आहे. पण आम्हा भावंडांच्या जोडीला कालपासून ही 'बच्चनसरांशी भेट' नावाची एक बहिण ही आयुष्यभरासाठी रुतलीय, आम्ही सुखात आहोत.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

Omprakash Raje Nimbalkar : जनतेनेच निवडणुक हाती घेतल्याने विजयाचा मार्ग सुकर - ओमराजे निंबाळकर

Lok Sabha Election : पहिल्या उमेदवारावर विश्वास नसल्याने दोन फॉर्म भरण्यात आले; राजेश मोरे यांची ठाकरे गटावर टीका

Champions Trophy 2025: 'तर पाकिस्तानला न येण्याचं लॉजिकल कारण द्या', भारतीय संघाच्या भूमिकेबाबत माजी क्रिकेटपटूचं वक्तव्य

Latest Marathi News Live Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे सिंधुदुर्गात दाखल

SCROLL FOR NEXT