Amitabh Bachchan, Shweta Nanda, Kapil Sharma Google
मनोरंजन

'भारताचा झेंडा दाढीवर,हे तुम्ही ठीक नाही केलं' अमिताभ बच्चन झाले ट्रोल

प्रजासत्ताक दिनानिमित्त बिग बी यांनी एक फोटो पोस्ट केला आहे ज्यामुळे ट्रोलर्स भडकले.

प्रणाली मोरे

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. ते आपल्या वैयक्तिक आयुष्यातल्याही खूप सुंदर सुंदर पोस्ट शेअर करीत असतात. कधी एखादी भावूक करणारी कविता तर कधी घराच्या अंगणाचा दर्शनीय भाग,कधी घरातील त्यांचा आवडता म्युझिकल कोपरा तर कधी त्यांच्या शुटिंगचा एखादा फोटो असं काही ना काही खूप इंट्रेस्टिंग अशा स्टोरीज ते इन्स्टाग्राम किंवा ट्वीटरवर पोस्ट करीत असतात. त्यांचे चाहतेही त्यांच्या या पोस्ट पाहण्यासाठी उत्सुक असतात. त्यांच्या पोस्टवर त्यांच्या चाहत्यांनी केलेल्या भरभरून कमेंट्स हा त्याचा दाखला म्हणता येईल.

आज भारताचा ७३ वा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करीत आहोत. भारतानं स्वातंत्र्याचं ७५ वं वर्ष साजरं केल्यानंतर हा प्रजासत्ताक दिन तसा विशेषच म्हणावा लागेल समस्त भारतीयांसाठी. दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील प्रजासत्ताक दिन सप्ताह साजरा केला जाणार आहे तो २३ जानेवारी ते ३० जानेवारीपर्यंत. अनेक बॉलीवूड कलाकारांनी देखील सोशल मीडिया पोस्टद्वारे प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आता यामध्ये अमिताभ बच्चन यांनीही प्रजासत्ताक दिनानिमित्त एक पोस्ट केली आहे. त्यांनी आपला एक फोटो पोस्ट केलाय. पण त्यावरून त्यांना आजच्या खास दिनी ट्रोल व्हावं लागलं आहे. काय आहे ती पोस्ट?

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांनी झेंड्याच्या रंगांप्रमाणे दाढी आणि मिशी रंगवल्याचे दिसत आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी ‘प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा’ असे कॅप्शन दिले आहे. सध्या सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांचा हा फोटो व्हायरल झाला आहे. पण या फोटोवर त्यांना खूप मिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. काही सेलिब्रिटींनी स्माईली पोस्ट केली आहे. त्यात कपिल शर्मा(Kapil Sharma) आणि बिग बी यांची मोठी मुलगी श्वेता नंदाचं नाव घेता येईल. काही चाहत्यांनीही हसून या पोस्टची प्रशंसा केली आहे. पण काहींना मात्र ही पोस्ट खटकली आहे. एका ट्रोलरने म्हटलं आहे,''तुमच्याकडून अशा पोस्टची अपेक्षा नव्हती. भारताचा झेंडा दाढीवर''. आता बिग बी यावर काय उत्तर देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishalgad Qurbani Permission : किल्ले विशाळगडावर उरुस काळात सार्वजनिक ठिकाणी कुर्बानी देण्यास बंदी; मांसाहार नेण्याबाबत कोर्टाचा काय आहे आदेश?

Vishnu Sahasranama: अधिक मासात विष्णू सहस्त्रनामाचा जप का करतात? रोजही वाचण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे

Latest Marathi News Live Update : इचलकरंजीत आयपीएल क्रिकेट बेटिंग प्रकरणी भाजपच्या नगरसेवकाला अटक

Pargaon News : अष्टविनायक महामार्गावर अनेक ठिकाणी डांबर उखडून पडले खड्डे; तर महामार्गावरील अनेक बसथांब्यांची दुरावस्था झाली आहे

D.K. Shivkumar: डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रियांका गांधींचा मोठा रोल; इनसाइड स्टोरी आली समोर

SCROLL FOR NEXT