Amruta Fadnavis Esakal
मनोरंजन

Amruta Fadnavis: 'तुम्ही राहू द्या!', अमृता फडणवीसांचं गाणं ऐकताचं पब्लिकनं लावला डोक्याला हात..

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची नेहमीच चर्चा असते. कुण्या कलाकरांचाही इतका चाहता वर्ग नसेल तितका अमृता फडणवीस यांचा आहे. त्याच्या गाणी त्याची फॅशन स्टाईल अशा बऱ्याच गोष्टीमुळे त्या नेहमीच चर्चेत असतात. 'मूड बनालीया' हे गाणं हे प्रेक्षकांना खुपच आवडलं. अल्पवधीतच या गाण्याने मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार केला.

अशातच त्यांनी आता आगामी BHARATEEYANS या चित्रपटात गाणे गायले आहे. ‘सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा’ हे या गाण्याचे बोल आहेत. प्रतासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे गाणं प्रसिद्ध करण्यात आले आहे.

सत्या कश्यप यांचे हे गाणे आहे. तर अमृता यांनी या गाण्याला आवाज दिला आहे. अमृता यांनी हे नवीन गाणं त्याच्या इन्स्टाग्रामवरही शेअर केलं. त्याच्या या गाण्याला मोठ्या प्रमाणात नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंटस करणं सुरु केले आहे.

अमृता यांचं हे गाण प्रेक्षकांना आवडलेलं दिसत नाहीये. त्याची प्रचिती ही कमेंट वाचल्यानंतर येत आहे. काहींनी त्याचे कौतुक केले तर काहींनी त्यांना नेहमीप्रमाणे ट्रोल केलयं.

'हे गाणं बॉर्डरवर लावा बंदुकीची गरजच पडणार नाही', 'भसाडा आवाज. अजरामर गाण्याचे मातेरे केले. बंद करा गाणे.', 'बाई आवरा स्वतःला......जरा जमिनीवर या.....किती भ्रम बाळगता', 'गीताचे बोल अर्थातच छान...पण आवाज,..श्रोत्यांच्या कानावर अत्याचार.... !' , तर एका युजरने, 'तुम्ही नका गात जाऊ',असा सल्लाच अमृता यांना दिला आहे. अशा अनेक कमेंट त्याच्या व्हिडिओला नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेख हसीना यांच्याबाबत भारताचं अधिकृत स्पष्टीकरण; बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून तीव्र संताप

MHADA Lottery: सर्वसामान्यांना हक्काचं घर मिळणार! म्हाडा मुंबईत साडेसात लाख घरं बांधणार; नवीन लॉटरी कधी निघणार? तारीख समोर

रविवार अन् मंगळवारी मातीची भांडी का खरेदी करू नये? जाणून घ्या

Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी चिंतेची बातमी! ११ ऑगस्टला पाणी साठवून ठेवा; 'या' भागात २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार

IND vs SLC XI Warm UP Match: गौतम गंभीरने ज्याला दुर्लक्षित केले, त्याने आज मैदान गाजवले! श्रीलंकेच्या आठ विकेट्स, भारताचे पुनरागमन

SCROLL FOR NEXT