amruta fadnavis shiv tandav song Esakal
मनोरंजन

Amruta Fadnavis: महाशिवरात्री निमित्त अमृता फडणवीस भक्तीत तल्लीन! गाणं शेअर करत दिल्या शुभेच्छा

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी काहीही केलं तरी त्याची चर्चा होतेच. अनेकवेळा त्यांच्या वक्तव्यामुळे तर काही वेळा त्याच्या गाण्यामुळे त्याचं कौतुकही होत तर कधी त्यांना ट्रोलही केलं जात. अमृता फडणवीस नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्याच्या गाण्याची आवड तर आपल्या सर्वांनाच माहित आहे. याआधीही त्यांनी अनेक गाणी गायली आहेत.

नुकतचं त्यांनी आज महाशिवरात्रीच्या निमीत्ताने त्याच्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र यावेळी शुभेच्छा देतांना त्यांनी त्याचं 'शिव तांडव स्रोतम' हे गाणं पुन्हा शेअर केलं आहे. अमृता यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर या गाण्याचा हा व्हिडीओ आणि लिंक शेअर केली आहे. त्याचबरोबर, " ॐ नम: पार्वती पतये, हर हर महादेव ! सर्वांना ‘महाशिवरात्री’च्या पवित्र पर्वाच्या मंगलमयी शुभेच्छा..", असं कॅप्शन दिलं आहे.

मागील वर्षी 24 फेब्रुवारी रोजी त्याचं 'शिव तांडव स्रोतम' हे गाणं रिलिज झालं होतं. या गाण्यात अमृता या साध्वीच्या रूपात शिव तांडव स्तोत्र म्हटले आहे. रवी जाधव दिग्दर्शित या गाण्याला शैलेश दानी यांनी याचे संगीत दिग्दर्शन केले आहे. या गाण्याला 13 मिलिअन व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्याला प्रेक्षकांनी भरभरुन दाद दिली आहे.

अमृता फडणवीस याच्या गाण्याला काही वर्ग ट्रोल करत असला तरी त्याच्या गाण्याचे चाहतेही कमी नाहीत. त्यांनी आता पर्यंत ‘शिव तांडव स्रोतम’, ‘वो तेरे प्यार का गम’, ‘तेरी मेरी फिर से’, ‘बेटिया’, ‘कुणी म्हणाले’, ‘तेरी बन जाऊंगी’, ‘अज मैं मूड बणा लेया ए ए ए, तेरे नाल ही नचणा वे!’ अशी लोकप्रिय गाणी गायली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रशांत किशोरांची पवार कुटुंबासोबत बैठक; सुनील तटकरे अनभिज्ञ; म्हणाले, ''ते आमच्यासाठी काम करतायेत माहीत नाही''

Abhijeet Dipke: घरासमोर CID अधिकारी, 'हिट स्प्रे' ग्रुपचा दावा अन्... DCP ला थेट फोन करत अभिजीत दिपकेंचे गंभीर आरोप, नेमकं काय घडलं?

Mumbai Crime: फ्री वायफाय वापरणं महागात पडलं! वरिष्ठ बँक अधिकाऱ्याचा फोन हॅक, भामट्यांकडून २८ मिनिटांत ४ लाखांचा व्यवहार

Rohit Sharma: रोहित नाही तर कोण? 2027 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाकडे सलामीचे हे 3 पर्याय; एक नाव सर्वात आघाडीवर

FDA Crime : आयुर्वेदिक औषधांत आढळली बुरशी अन्‌ अळ्या; इंड्युकेअर फार्माचा उत्पादन परवाना रद्द

SCROLL FOR NEXT