Ananya Panday Esakal
मनोरंजन

Ananya Panday: पण तू बादली घेवुन का आलीस? अनन्या पाहताच नेटकऱ्यांना पडला प्रश्न

Vaishali Patil

बॉलीवूडमधील सध्याची आघाडीची आणि चंकी पांडेची मुलगी अभिनेत्री अनन्या ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. नेहमी ती असं काही तरी करते की तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. ती तिच्या वेगवेगळ्या लूक्समुळे नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपुर्वीही तिच्या बिकीनी लूकमुळे खुपच चर्चेत आली आहे. त्यावर तिला नेटकऱ्यांनी चांगलच ट्रोल केलं होतं.

गेल्या काही दिवसांपासून अनन्या ही वेगवेगळया कारणांमुळे चर्चेचा विषय होताना दिसत आह. कधी ती आणि शाहरुखचा मुलगा आर्यन खान यांच्यामुळे तर कधी आदित्यसोबतच्या डेटिंगवरील अफवांमुळे तिची चर्चा होत असते.

ती विजय देवरकोंडासोबतच्या लायगर मध्ये दिसली पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप झाला होता.मात्र अनन्या बऱ्याच कार्यक्रमात दिसते. ती तिच्या फ्रेंडसोबत पार्टीतही दिसते. तिचे बरेच फोटो आणि व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. आता ती पुन्हा ती अशाच एका व्हिडिओमुळे लाईमलाईटमध्ये आली आहे. तिच्या त्या व्हिडिओनी सोशल मीडियावर नेटकऱ्यांच लक्ष वेधून घेतले आहे.

Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

ती काल रात्री एका कार्यक्रमात सहभागी अनन्या सहभागी झाली होती. या कार्यक्रमात पुलकित सम्राट, सोनम बाजवा, सुष्मिता सेन, माधुरी दीक्षित, क्रिती खरबंदा, जान्हवी कपूर, क्रिती सेनन, आयुष्मान खुराना आणि शिल्पा शेट्टी यांसारख्या बड्या स्टार्सनी उपस्थिती लावली होती. दरम्यान अनन्या पांडेने नेटिझन्सचे लक्ष वेधुन घेतले. ती तिच्या लुकमुळे नाही तर तिच्या पर्समुळे चर्चेत आली. यावेळी तिने बादलीच्या आकाराची बनवलेली एक छोटी पर्स सोबत आणली होती. जी पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवली आहे.

'ही पर्स आहे की बादली' असं खुद्द पापराझींनीच तिला म्हटलं. हा व्हिडिओ इंटरनेटवर येताच लोक जोरदार कमेंट करत आहेत. बाकी सगळ ठिक आहे पण ही बादली का आणलीस, तर काहींनी या पर्सचा आकार तुझ्या स्ट्रगल इतका असल्याच देखील तिला बोलल आहे. कहर म्हणजे एकाने लिहिलयं की, 'जातांना त्यात ती तिचं जेवण भरुन घेवुन जाणार असेल' तिचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

अनन्या पांडेच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती अभिनेत्री लवकरच विक्रमादित्य मोटवाने यांच्या सायबर क्राईम थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे. ती फरहान अख्तरच्या 'खो गए हम कहाँ' मध्ये सिद्धांत चतुर्वेदी आणि आदर्श गौरव सोबत दिसणार आहे. सध्या अनन्या आयुष्मान खुरानाच्या 'ड्रीम गर्ल 2' च्या रिलीजच्या तयारीत आहे. हा चित्रपट २५ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. अनन्याही 'कॉल मी बे' मधून वेब सीरिजमध्ये पदार्पण करत आहे. हा शो Amazon Prime Video वर स्ट्रीम होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT