Ananya Soni esakal
मनोरंजन

Ananya Soni: 'क्राईम पेट्रोल' फेम अनन्या सोनीची किडनी फेल, प्रकृती गंभीर

अनन्यानं सोशल मीडियावरुन पोस्ट शेयर करुन चाहत्यांना देवाकडे प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Anaya Soni Crime Petrol fame Kidney Failure: क्राईम पेट्रोल, इश्क मैं मर जावा मालिका फेम अनन्या सोनीच्या प्रकृतीविषयी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तिनं इंस्टावर पोस्ट शेयर केली असून त्यामध्ये आपली किडनी फेल झाली असून प्रकृती चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला असून त्यांनी तिला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. अनन्या ही तिच्या वेगळ्या धाटणीच्या अभिनयासाठी ओळखली जाणारी सेलिब्रेटी आहे. अल्पावधीत तिनं मोठी प्रसिद्धी मिळवली आहे.

क्राईम पेट्रोलमधील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाल्याचे दिसून आले आहे. याशिवाय नामकरणमधील तिच्या परफॉर्मन्सचे प्रेक्षकांनी कौतूक केले होते. आता तिच्यावर ओढावलेल्या प्रसंगाने चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. अनन्या सध्या रुग्णालयात उपचार घेत असून तिनं सोशल मीडियावर केलेल्या पोस्टनं खळबळ उडाली आहे. शनिवारी रात्री तिनं उशिरा केलेल्या पोस्टनं टीव्ही मनोरंजन विश्वातील चाहत्यांनी तिच्याबद्दल काळजी व्यक्त केल्याचे दिसून आले आहे.

चाहत्यांनी अनन्याला सोशल मीडियावरुन काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. माझ्यासाठी प्रार्थना करा असे आवाहनही तिनं चाहत्यांना केले आहे. गेल्या काही दिवसांपासून अनन्या किडनीच्या विकारानं त्रस्त होती. आता तो त्रास जास्त बळावल्यानं तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावर तिनं दिलेल्या प्रतिक्रियेत आपली किडनी फेल झाल्याचे सांगून चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे.

या पोस्टमध्ये अनन्यानं येत्या काळात आपल्यावर किडनी प्रत्यारोपणासाठीची प्रक्रिया सुरु केली असल्याचे सांगत मेडिकल रिपोर्टविषयी देखील सांगितले आहे. यावेळी चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत तिला या संकटातून बाहेर येण्यासाठी देवाकडे प्रार्थना केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT