animal movie success party ranbir kapoor alia bhatt bobby deol and others attend SAKAL
मनोरंजन

Animal Success Party: सक्सेस पार्टीत लॉर्ड बॉबीची शान, रणबीर - आलियाचा स्टायलिश अंदाज, व्हिडीओ व्हायरल

कलाकारांच्या उपस्थितीत 'अ‍ॅनिमल'ची सक्सेस पार्टी साजरी झाली

Devendra Jadhav

Animal Success Party Video: रणबीर कपूरची प्रमुख भूमिका असलेला 'अ‍ॅनिमल' सिनेमा चांगलाच गाजला. अजूनही 'अ‍ॅनिमल' पाहण्यासाठी थिएटरमध्ये हाऊसफुल्ल गर्दी होत आहे. रणबीर - अनिल कपूर - बॉबी देओल अशा अनेक कलाकारांच्या अभिनयाचं खुप कौतुक होतंय.

'अ‍ॅनिमल'ने जगभरातून ५०० कोटींपेक्षा जास्त गल्ला कमावला आहे. अशातच काल रात्री कलाकारांच्या उपस्थितीत 'अ‍ॅनिमल'ची शानदार सक्सेस पार्टी झाली. त्यावेळी अनेक कलाकारांच्या हजेरीने सोहळ्याला चार चॉंद लागले.

रणबीर - आलिया सहकुटुंब पार्टीत सहभागी

चित्रपटाच्या सक्सेस पार्टीत रणबीर कपूर आणि आलिया भट्ट अतिशय स्टायलिश स्टाईलमध्ये पोहोचले. ग्रे पँट सूट आणि ब्लॅक कोटमध्ये रणबीर खूपच सुंदर दिसत होता. दरम्यान, आलिया भट्ट रॉयल ब्लू कलरच्या डीप नेक ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती. दोघांनीही पोझ देऊन फोटोशूट केलं. रणबीर कपूरची आई नीतू सिंग, आलियाचे वडील आणि दिग्दर्शक महेश भट्ट यांनीही या पार्टीला हजेरी लावली. नीतू सिंगनेही तिच्या स्टायलिश लूकने सर्वांचं लक्ष वेधलं.

'अ‍ॅनिमल'मध्ये खलनायकाची भूमिका साकारून वाहवा मिळवणारा बॉबी देओलही पार्टीत आला. लॉर्ड बॉबीच्या स्टाइलने सगळेच प्रभावित झाला. बॉबी देओलचे फोटो क्लिक करण्यासाठी सर्वांनी एकच गर्दी केली.

याशिवाय चित्रपटात रणविजयच्या (रणबीर कपूर) वडिलांची भूमिका साकारणारे अभिनेते अनिल कपूर सुद्धा पार्टीत उपस्थित होते.

सध्या या पार्टीचे फोटो, व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत आहेत. या पार्टीत अ‍ॅनिमल'ची सर्व कास्ट याशिवाय फराह खान आणि प्रेम चोप्रा यांच्याशिवाय इतर अनेक स्टार्सनीही या पार्टीला हजेरी लावली.

1 डिसेंबर 2023 रोजी रिलीज झालेला 'अॅनिमल' हा चित्रपट संदीप रेड्डी वंगा यांनी दिग्दर्शित केला आहे. हिंसक दृश्यांमुळे चित्रपटाला खूप टीकेला सामोरे जावे लागले, मात्र चित्रपटाने कमाईच्या बाबतीत अनेक विक्रम केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT