Anjali Arora  Instagram
मनोरंजन

Viral Video: अंजली अरोराला पाहून हाताबाहेर गेलं पब्लिक..सुरक्षारक्षकानं गर्दीवर पाणी फेकलं अन्..

अंजलीच्या चाहत्यांनी ती बसलेल्या हॉटेलच्या काचेच्या दर्शनी भागाजवळ गर्दी केली तेव्हा हा प्रकार घडला पण त्यानंतर अंजलीनं जे केलं ते अधिक चर्चेत आलंय.

प्रणाली मोरे

Anjali Arora Viral Video: सोशल मीडिया स्टार अंजली अरोराचं गेल्या काही दिवसांत तगडं फॅनफॉलोइंग जमलं आहे. अंजलीचे फोटो आणि व्हिडीओज नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात,ज्यामध्ये कधी तिचा ग्लॅमरस अंदाज तर कधी किलर डान्स मू्व्हज लोकांना घायाळ करताना दिसतात.

अंजलीवर चाहते नेहमीच कौतूकाचा वर्षाव करतात आणि ती देखील आपल्या चाहत्यांचा योग्य तो मान राखते. असंच काहीसं नुकतंच पहायला मिळालं,जेव्हा अंजलीच्या चाहत्यांवर सुरक्षारक्षकानं पाणी फेकलं.(Anjali Arora video viral when she reacted water throws on her fans)

सोशल मीडियावर अंजली अरोराचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. ज्यामध्ये अंजली एका रेस्टॉरंटमध्ये काही लोकांसोबत बसली आहे. या व्हिडीओत दिसत आहे की रेस्टॉरंटच्या बाहेर अंजलीचे काही चाहते ताटकळत उभे आहेत.जे अभिनेत्रीला पाहून खूप खूश आहेत.

या चाहत्यांपैकी काहीजण अंजलीला पाहण्यासाठी रेस्टॉरंटच्या दर्शनी भागाजवळ एकदम चिटकून उभे राहतात..जो काचेचा आहे. त्यामुळे रेस्टॉरंटचा सुरक्षारक्षक चिडून त्यांच्यावर पाणी फेकतो,जेणेकरुन ते तिथून निघून जातील.

हे पाहून अंजली भडकते आणि त्याला लोकांसोबत असं करू नका म्हणून सुनावते.

हेही वाचा: महिलांनो तरुणपणी घेतलेली जमीन उतारवयात होईल आधार

आता अंजलीचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर त्यावर नेटकऱ्यांच्या असंख्य कमेंट्स वाचायला मिळत आहेत. एकीकडे जिथे सोशल मीडियावरील नेटकरी तिच्या वागणुकीसाठी प्रशंसा करतायत तिथे दुसरीकडे काहीजण अंजलीला ट्रोल करताना दिसत आहेत.

एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की,'ही किती गोड आहे..आपल्या चाहत्यांची किती काळजी घेते'. तर आणखी एकानं लिहिलं आहे की,'एवढंच हिला वाटत होतं तर बाहेर येऊन भेटायचं चाहत्यांना'. अशाच संमिश्र कमेंट्स वाचायला मिळत आहेत.

अंजली अरोरा तिच्या एका व्हिडीओनंतर सोशल मीडियावर चर्चेत आली होती. अंजली अरोराचं 'कच्चा बदाम' गाण्यावर नाचणं लोकांना भलतंच आवडलं होतं. यानंतर ती रातोरात स्टार झाली होती.

अंजली अरोराचे इन्स्टाग्रामवर काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले,ज्यानंतर तिला कंगना रनौतच्या 'लॉकअप'मध्ये संधी मिळाली. त्यानंतर काही म्युझिक व्हिडीओमध्ये ती दिसली. इन्स्टावर अंजलीचा जलवा नेहमीच पहायला मिळतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वापरलेल्या खाद्यतेलापासून बनणार विमानाचं इंधन, भारतात पहिला SAF प्लांट सुरू करण्यास इंडियन ऑइलला परवानगी

Asia Cup 2025: आधी खेळ सुधार! बाबर आझमला कोचची स्पष्ट ताकीद; पाकिस्तान संघातून हाकालपट्टीमागचं खरं कारणही सांगितलं

Ranthambore National Park : वाघांनी भरलेल्या घनदाट जंगलात पर्यटकांना अंधारात सोडून गाईड गेला पळून, ९० मिनिटांत जे घडलं...

Latest Marathi News Live Updates : मुंबईत मुसळधार पाऊस, पुढील तीन तास धोक्याचे

Sunil Chhetri: सुनील छेत्रीला सराव शिबिरातून वगळलं; सिंगापूर सामन्यासाठी भारतीय संघाचे दरवाजे अजूनही खुले : खालिद जमील

SCROLL FOR NEXT