Ankit Tiwari complains about a plush hotel on their services
Ankit Tiwari complains about a plush hotel on their services Google
मनोरंजन

बड्या हॉटेलात बंदी बनवून ठेवल्याचा गायक अंकित तिवारीचा खळबळजनक दावा

प्रणाली मोरे

बॉलीवूड गायक अंकित तिवारीनं(Ankit Tiwari) दिल्लीच्या एका फाइव्ह स्टार हॉटेलमधील स्टाफवर एक खळबळजनक आरोप केला आहे. 'गलियां' आणि 'सुन रहा है ना तू' फेम गायक अंकित तिवारीनं ट्वीटरवर व्हिडीओ शेअर करत सांगितलं आहे की,तो दिल्लीच्या कनॉट प्लेस स्थित 'रॉयल प्लाझा' या हॉटलमध्ये वास्तव्यास होता. तेव्हा रात्री उशिरा साधारण दीडपर्यंत ना त्याच्या खाण्याची व्यवस्था करण्यात आली ना पाण्याची. अंकितने या व्हिडीओसोबत ट्वीटही केलं आहे,. त्यानं लिहिलं आहे की, ''त्याच्या कुटुंबाला हॉटेलमध्ये चुकीची वागणूक देण्यात आली. आम्ही जणू त्या हॉटेलमध्ये गेस्ट नाही बंदी आहोत असा तिथला स्टाफ आमच्याशी वागत होता. जेवण ऑर्डर करून ४ तास उलटून गेले तरी काहीच व्यवस्था केली नव्हती. अंकितनं आरोप केलाय की,जेव्हा त्यानं यासंदर्भात हॉटेल स्टाफकडे तक्रार केली तेव्हा त्याला बाऊन्सरची धमकी देण्यात आली.

अंकितनं ट्वीटरवर लिहिलं आहे,''हॉटेल रॉयल प्लाझा,नवी दिल्ली. कुटुंबासोबत इथे बंदी म्हणून राहतोय की काय असं वाटत आहे. नावाला फाइव्ह स्टार हॉटेल,पण ना इथे पाणी,ना जेवणाची व्यवस्था. ऑर्डर देऊन ४ तास उलटून गेले आहेत...बाहेरुन जेवण आणायची इथे परवानगी नाही. त्यामुळे कोणताच दुसरा ऑप्शन नाही. काही बोललं तर स्टाफ बाऊन्सरची धमकी देत आहेत''. अंकितनं जो व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे,तो १ मिनिट २९ सेकंदाचा आहे. हा व्हिडीओ हॉटेलच्या लॉबीमध्ये शूट केला आहे. अंकितसोबत तिथे आणखी काही जण दिसत आहेत. व्हिडीओमध्ये अंकित सांगताना दिसत आहे की,या हॉटेलमध्ये ना जेवण ना पाणी,भुकेने झोपच लागली नाही,सकाळी ५ वाजता झोप लागली. अंकितनं सांगितलं की तो कुटुंबासोबत हरिद्वारला गेला होता. तेव्हा प्रवासात दिल्लीला एक रात्र थांबण्याचा प्लॅन होता. आणि तिथून वृंदावनला जायचं होतं. अंकित आपली बायको आणि लहान मुलीसोबत रॉयल प्लाझा हॉटेलात थांबला होता.

अंकितनं आपल्याला झालेल्या त्रासाविषयी सांगताना म्हटलं आहे की,''इथे ४५ मिनिटं चेकइन करायला लागली. त्यानंतर आम्ही आमच्या रुममध्ये गेलो. तिथून जेवण ऑर्डर केलं. तीन तास होऊन गेले,पण जेवण काही आलं नाही. ना पाणी मिळालं. माझी मुलगी तीन वर्षाची आहे. तिच्यासाठी दूध ऑर्डर केलं,पण तरिही अद्याप ते देखील आलं नाही. रुम सर्व्हिससाठी कोणी फोनही उचलत नाही. जेव्हा मी रीसेप्शनला आलो तेव्हा तेथील स्टाफ अतिशय उर्मट भाषेत बोललं. जवळ-जवळ ते शिव्यांचीच भाषा करत होते. हात उगारुन बोलत होते. इतकंच नाही तर सिक्युरिटी आणि बाऊन्सर्सला बोलवायची धमकी दिली''.

गायक अंकित तिवारीचं म्हणणं आहे की,''त्यानं हॉटेलला सांगितलं की त्याचे पैसे परत द्या. पण त्यावर हॉटेल मॅनेजमेंटने काहीच कार्यवाही केली नाही. सगळे फक्त आमच्याकडे पाहून हसत होते. आणि तेवढ्या रात्री मी बायको,मुलीला घेऊन कुठे गेलो असतो''. व्हिडीओच्या शेवटी अंकित म्हणतोय,''मी याआधी अशाप्रकारचं ट्वीट कधीच केलं नव्हतं. पण या हॉटेल स्टाफच्या गैरवर्तणुकीनं मला असं करायसा मजबूर केलं. जर हे लोक आमच्यासारख्या नावाजलेल्या आर्टिस्टसोबत असं करू शकतात तर हे सर्वसामान्यांसोबत काय करत असतील? यांनी ज्या पद्धतीनं आपल्या गेस्टला सर्व्हिस दिली आहे याची त्यांना लाज वाटली पाहिजे''.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

SCROLL FOR NEXT