Anupam Kher esakal
मनोरंजन

Anupam Kher: वयाची सत्तरी, बॉलीवूड अभिनेत्याची 'सिक्स पॅक' बॉडी

बॉलीवूडमध्ये असे काही अभिनेते आहेत ज्यांच्या अभिनयाची जादू कायमच प्रेक्षकांच्या मनात कोरली गेली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Bollywood Actor: बॉलीवूडमध्ये असे काही अभिनेते आहेत ज्यांच्या अभिनयाची जादू कायमच प्रेक्षकांच्या मनात कोरली गेली आहे. त्यापैकी (Anupam Kher) एक अभिनेते म्हणजे अनुपम खेर. या अभिनेत्यानं दोन दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मननावर गारूड़ (Entertainment News) केलं आहे. अभिनेता व्हायचं स्वप्न घेऊन बॉलीवूडमध्ये आलेल्या अनुपम यांनी आतापर्यत वेगवेगळ्या प्रकारच्या (Bollywood Celebrity) भूमिका साकारल्या. त्यात चरित्र अभिनेता, खलनायक, विनोदी अभिनेता, सहाय्यक अभिनेता या भूमिकांचा उल्लेख करावा लागेल. आज अनुपम खेर यांचा 67 वा जन्मदिन आहे. त्यानिमित्तानं आपण त्यांच्याशी संबंधित काही गोष्टी जाणून घेणार आहोत. anupam kher birthday story body building look viral

अनुपम खेर नेहमीच त्यांच्या हटके स्टाईलसाठी ओळखले जातात. त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त (Anupam Kher Birthday Story) एक वेगळाच फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यामध्ये त्यांचा चक्क सिक्स पॅकमधला लूक व्हायरल झाला आहे. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्यावर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंटस दिल्या आहेत. या वयातही अनुपम खेर यांचा उत्साह हा चाहत्यांना अवाक करणारा आहे. अनुपम हे सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट शेयर करत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांना पाकिस्तानातील मुलांच्या अनोख्या क्रिएटिव्हिटीचा व्हिड़िओ व्हायरल केला होता. ते सध्या एका मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असून त्यालाही चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

बॉलीवूडमध्ये तब्बल 500 हून अधिक चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अनुपम यांचा अनुभव दांडगा आहे. तितकाच त्यांचा संघर्षही मोठा आहे. नवोदित कलाकारांना मार्गदर्शन करण्यातही अनुपम खेर हे नेहमीच अग्रेसर असतात. त्यांच्याबरोबर काम केलेल्या नवोदित कलाकारांनी आदरयुक्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. आज त्यांच्या जन्मदिनानिमित्तानं अनेक बॉलीवूड सेलिब्रेटींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA: शुभमन गिल टीम इंडियासोबत दुसऱ्या कसोटीसाठी प्रवास करणार की नाही? अखेर BCCI नेच दिले अपडेट

Viral News : ऑफिसमध्ये मॅनेजर बनायचा हिटलर! सुट्टी-वर्क फ्रॉम होमवर विचारायचा शंभर प्रश्न; वैतागून तरुणाने केला धक्कादायक प्रकार

Latest Marathi Breaking News Live Update : आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवला शीतल तेजवानीचा जबाब

Satara Politics:'भाजपचा सातारा नगरपालिकेत महाविकास आघाडीला दणका'; आशा पंडित बिनविराेध विजयी..

Kolhapur Election: कोल्हापुरात निष्ठेला तिलांजलि, संधिसाधू राजकारणाची परंपरा जुनीच; मुश्रीफ-घाटगे युतीमुळे पुन्हा चर्चा

SCROLL FOR NEXT