Anupam Kher Instagram
मनोरंजन

Photo Challenge:अनुपम खेर बाथटबमध्ये...? बिचारे नेटकरी लागलेयत कामाला

अनुपम खेर नेहमीच सोशल मीडियावर धम्माल आणणारं काहीतरी नेहमीच शेअर करीत असतात.

प्रणाली मोरे

सोशल मीडिया(Social Media) हे आता एक असं माध्यम आहे जिथं सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटी पर्यंत सारेच भलतेच सक्रिय झालेले पहायला मिळतात. मग कुठलीही ट्रेंडिंग गोष्ट आली की सगळेच इथं आपली मनातली हौस भागवून घेतात. मग ती हौस कधी फोटो तर कधी व्हिडीओ तर कधी डान्सिंग रीलच्या माध्यमातून पूर्ण केली जाते. सोशल मीडियावर सक्रिय रहायला इथे वयाचं बंधन नाही. जन्मलेल्या बाळापासून ते शंभरी गाठलेल्या आजी-आजोबांपर्यंत सारे इथे व्यक्त होताना दिसतात. अनुपम खेर (Anupam Kher) हे बॉलीवूडचे(Bollywood) मोठे स्टार,ज्येष्ठ अभिनेते. ते तर आजकाल भलतेच सोशल मीडियावर सक्रिय दिसतात. आता तर त्यांनी त्यांच्या चाहत्यांना थेट एक आव्हानच दिलेलं पहायला मिळत आहे.

अनुपम खेर यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केलाय. ज्यात ते एका बाथटब मध्ये चक्क झोपल्याचं दिसत आहे. खूप क्युट फोटो आहे खरं तर तो. पण या फोटोला कॅप्शन देताना त्यांनी म्हटलं आहे,''मला हा फोटो खूप आवडला आहे.तुम्हाला आवडला का? याला समर्पक असं कॅप्शन द्या,मला आवडलेले पहिले पाच कॅप्शन्स लिहिणाऱ्यांना मी माझ्या घरी येण्याचं निमंत्रण भविष्यात देणार आहे....'' हा फोटो(Photo) पोस्ट (Post)झाल्यावर आणि अनुपम खेर यांनी दिलेलं आव्हान वाचल्यावर त्यांच्या चाहत्यांमधील क्रिएटिव्हिटी जागृत झाल्याचं दिसतंय. अनेकांनी वेगवेगळे कॅप्शन्स या फोटोला दिले आहेत. आता पहायचं कोणाचं कॅप्शन अनुपम खेर यांना आवडतं आणि कोणाला अनुपम खेर यांच्या घरचा पाहुणचार अनुभवण्यास मिळतोय.

सोशल मीडियावर अनुपम खेर यांच्या या फोटोनो धमाल आणलीय. त्यांच्या चाहत्यांपासून सारेच नेटकरी कामाला लागलेले पहायला मिळत आहेत. अनुपम खेर यांच्यासोबतच त्यांची ८०-८५ वयाची आईही खूप इंट्रेस्टिंग आहे. अभिनेता नेहमीच आईसोबतचे धमाल व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर करीत असतो. खऱंच ग्रेट अॅक्टर. सारांश सारखा सिनेमा करतानाचे अनुपम खेर आठवले की हा माणूस विनोदातही कशी बाजी मारून जातो याचं खरंच आश्चर्य वाटू लागतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Solapur Highway Accident : टायर फुटून क्रूझर थेट ट्रकवर आदळली, तिघांचा जागीच मृत्यू; गाडीचा चुराडा

Latest Marathi News Live Update : मुंबईत एसीबीची मोठी कारवाई! सहाय्यक पोलीस निरीक्षकाला लाच घेताना रंगेहात पकडलं

Gold Investment: HSBC चा पहिला Gold ETF लॉन्च! गुंतवणूकदार दूर जात असताना मोठी एंट्री; सोन्यात गुंतवणुकीची नवी संधी?  

Google चा मोठा खुलासा! Zero Day मुळे धोक्यात आलेत 3.5 अब्ज क्रोम वापरकर्ते; आत्ताच 'हा' एक बदल नाही केला तर डेटा होऊ शकतो गायब

8th Pay Commission : वेतनवाढीपूर्वीच कर्मचाऱ्यांना मोठा धक्का ! 'या' मुद्द्यावर सरकारने दिला स्पष्ट नकार

SCROLL FOR NEXT