Pankaj Tripathi  Esakal
मनोरंजन

Pankaj Tripathi: असा झाला पंकज 'गँग्स ऑफ वासेपूर'चा सूलतान...

सकाळ डिजिटल टीम

पंकज त्रिपाठी यांनी आजवर अनेक भूमिका साकारल्या. आपल्या अनोख्या अंदाजाने त्यांनी प्रत्येक भूमिकेला न्याय दिला आहे. त्यांची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना भावली. आता लवकरच ते अटलजींच्या भूमिकेत दिसणार आहेत. नुकतंच या चित्रपटाचं नाव आणि फर्स्ट लुकही समोर आला.

त्याच्या लोकप्रियतेबद्दल बोलायचं झालं तर त्यांना खरी लोकप्रियता आणि ओळख 'गँग्स ऑफ वासेपूर' या चित्रपटातून मिळाली पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की दिग्दर्शक अनुराग कश्यपला त्याच्या 'गँग्स ऑफ वासेपूर' चित्रपटात पंकजला कास्ट करायचे नव्हते.

कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा याच्याकडे क्राइम अ‍ॅक्शन चित्रपटासाठी कलाकार शोधण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी अलीकडेच माहीती दिली की त्यांना कास्ट करायचं असलेल्या 384 लोकांना शोधण्यात त्यांना तब्बल एक वर्ष लागलं.

त्याने जेव्हा अनुराग कश्यपला सुलतानच्या भूमिकेसाठी पंकज याचं नावं सूचवलं होतं. तेव्हा अनुराग कश्यपने स्पष्ट नकार दिला होता, त्याला पंकज त्रिपाठीबद्दल खात्री नव्हती. तो कोण आहे हे देखील त्याला माहीत नव्हते. त्यावेळी पंकज त्रिपाठी NSD मध्ये होते. त्यामूळं त्यांना अभिनय जमेल की नाही या बद्दल शंका होती.

त्यावेळी पंकज त्रिपाठी दक्षिणेत शूटिंग करत होते, तरीही त्याना मुंबईला बोलावलं. पंकज त्रिपाठी आणि दुसऱ्या एका अभिनेत्यानं ऑडिशन दिलं. त्यामध्ये पंकज त्रिपाठी यांची ऑडिशन या रोलसाठी उत्तम झाली आणि सुलतान या भूमिकेसाठी त्यांची निवड झाली. गँग्स ऑफ वासेपूर चित्रपटातील सुलतानची भूमिकेला प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळाली आणि त्यांनतर पंकज त्रिपाठीचं नशीब बदललं.

तेव्हापासून पंकज त्रिपाठी यांनी मागे वळून पाहिले नाही. फुक्रे, मसान, न्यूटन, बरेली की बर्फी, लुडो आणि 83 यासह अनेक चित्रपटांमध्ये ते दिसले शेरदिल: द पीलीभीत सागा या चित्रपटात तो गंगा रामच्या भूमिकेत शेवटचा दिसला होता. तो लवकरच क्रिमिनल जस्टिस: अधूरा सच या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : कोकण, घाटमाथा, विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’; उर्वरित कोकण, विदर्भात जोरदार पाऊस शक्य

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

MS Dhoni Birthday: धोनी का आहे दिग्गज खेळाडू, याची साक्ष देणारे हे रेकॉर्ड्स माहित आहेत का?

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

SCROLL FOR NEXT