Anushka Sharma Esakal
मनोरंजन

Anushka Sharma: अनुष्का शर्मासाठी पुन्हा एक गुडन्यूज!

Vaishali Patil

अनुष्का शर्मा ही नेहमीच तिच्या हटक्या लूकसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री आहे. बॉलीवूडमध्ये आपल्या नावाची वेगळी ओळख अनुष्कानं तयार केली आहे. आज तिची वेगळ्या कारणामुळे चर्चा रंगली आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये अनुष्का शर्माचे पदार्पण जोरात सुरू आहे.

अनुष्का लवकरच कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये डेब्यू करणार असल्याचं वृत्त आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या कार्यक्रमात जगभरातील महिलांना सन्मानित केले जाते ज्यात अनुष्कादेखील सहभागी होणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमात अनुष्कासोबत टायटॅनिक अभिनेत्री केट विन्सलेटही दिसणार आहे.

गेल्या वर्षी कान्समध्ये दीपिका पदुकोणने तिच्या मंत्रमुग्ध लूकने रेड कार्पेटवर तिचा जलवा दाखावला होता. दिपिकाही कान्स ज्युरीचा भाग होती आणि तिच्या वेळापत्रकाचा भाग म्हणून तिने अनेक स्क्रीनिंग, पॅनेल चर्चा आणि पार्ट्या केल्या.

यावर्षी अनुष्का शर्मा कान्समध्ये पदार्पण करणार असल्याचं दिसते. भारतातील फ्रान्सचे राजदूत इमॅन्युएल लेनेन यांनी ट्विटरवर विराट कोहली आणि अनुष्कासोबतचा एक फोटो शेअर केला असून, अनुष्काच्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्याचे संकेत दिले आहेत.

भारताचे फ्रेंच राजदूत इमॅन्युएल लेनिन यांनीच अनुष्का शर्मा चित्रपट जगतातील सर्वात मोठ्या कार्यक्रमाचा भाग असेल, अशी माहिती दिली आहे.

फ्रेंच राजदूत हे अनुष्का आणि विराट कोहलीची भेट घेतली. राजदूताने ट्विटरवर ही माहिती दिली आहे.

त्याने लिहिले की, 'विराट कोहली आणि अनुष्काला भेटून छान वाटलं, आगामी स्पर्धेसाठी मी विराट आणि टीम इंडियाचे अभिनंदन केले आणि अनुष्का शर्मासोबत कान्स फिल्म फेस्टिव्हलवर चर्चा केली.

आता सोशल मिडियावर सर्वत्र अनुष्काच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या पदार्पणाचीच चर्चा आहे. तुम्हाला सांगतो की यापूर्वी, इतर बॉलीवूड सेलिब्रिटींमध्ये, प्रियांका चोप्रा, सोनम कपूर, मल्लिका शेरावत, पूजा हेगडे, तमन्ना भाटिया, अदिती राव हैदरी यांसारख्या अभिनेत्रींनी कान्सच्या रेड कार्पेटवर हजेरी लावली आहे.

केनेडी आणि आग्रा हे भारतीय चित्रपट यावर्षी कान्समध्ये प्रदर्शित होणार आहेत. कान्स फिल्म फेस्टिव्हल यावर्षी 16 मे ते 27 मे दरम्यान होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke: भाजप-IT सेल भारतीय, बाकी पाकिस्तानी? हिंदू-मुस्लिम करून नोकऱ्या मिळत नाहीत; अभिजित दिपकेंची सरकारवर टीका

India-Nepal Dispute: सीमा वादावर नेपाळचा मवाळ सूर! भारताविरोधात संघर्ष नव्हे, संवाद हवा, परराष्ट्र मंत्र्यांचं मोठं विधान

IND vs AFG Test, 2nd Day: भारताच्या साडेपाचशे धावा अन् अफगाणिस्तानचा अर्धा संघ तंबूत; पदार्पणवीर मानव सुतार चमकला

Maratha Reservation: मराठा आंदोलनातील ५६ गुन्हे मागे; राज्य सरकारने पुन्हा मागविली पोलिसांकडून माहिती, जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर हालचाली

Crime: लग्नाआधीच वधू पळाली, नंतर बहिणीसोबत लग्न ठरवलं; पण तिचं भलतंच सत्य समोर येताच वर संतापला अन्... थरारक घटनेनं मंडपात खळबळ

SCROLL FOR NEXT