Celebrity Childhood Photo Viral Esakal
मनोरंजन

Viral Photo: एकाच शाळेत शिकल्यात 'या' दोन दिग्गज क्रिकेटर्सच्या बायका.. दोघींच्या शाळेतील फोटोनं वेधलं लक्ष

सेलिब्रिटींचे बालपणीचे फोटो नेटकऱ्यांमध्ये नेहमीच चर्चेचा विषय ठरतात.

प्रणाली मोरे

Viral Photo: विराट कोहलीची पत्नी आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि CSK स्किपर महेन्द्र सिंह धोनीची पत्नी साक्षी धोनी एकाच शाळेत शिकल्या आहेत. या दोघींनी आसामच्या एकाच शाळेतून शिक्षण घेतलं होतं आणि बोललं जातं की दोघी चांगल्या मैत्रिणी देखील होत्या.

अर्थात यामागे एक किस्सा असा आहे की दोघी एकाच शाळेत शिकल्यात हे खूप वर्षांनी दोघींना कळलं जेव्हा त्यांचं यासंदर्भात बोलणं झालं. (Anushka Sharma And Sakshi Dhoni repotedly childhood friends, photo viral)

आता अनुष्का आणि साक्षी यांच्या बालपणीचा एक फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या फोटोत दोघी एकत्र पोझ देताना दिसत आहेत. हा फोटो त्या दिवसातला आहे जेव्हा अनुष्का शर्माचे वडील कर्नल अजय कुमार शर्मा यांचे आसाममध्ये पोस्टिंग झाले होते.

त्या दिवसांत अभिनेत्री तिथल्या सेंट मेरी स्कूलमध्ये शिक्षण घेत होती. ही तिच शाळा आहे जिथे धोनीची पत्नी साक्षीनं शिक्षण घेतलं आहे. यांच्या लहानपणीचे फोटो बातमीत लिंक जोडलीय त्यात पाहू शकता.

शिक्षण झाल्यानंतर अनुष्का सिनेइंडस्ट्रीत आली आणि साक्षी धोनीनं हॉटेल मॅनेजमेंटमध्ये शिक्षण घेतलं. हॉटेल मॅनेजमेंट नंतर हॉटेलमधील जॉबच्या दरम्यान महेन्द्र सिंग धोनीसोबत साक्षीची भेट झाली होती आणि त्यादरम्यान त्यांच्यात आधी मैत्री मग प्रेमाचं नातं फुललं. धोनीच्या या लव्हस्टोरीला आपण 'एमएस धोनी-द अनटोल्ड स्टोरी' सिनेमाच्या माध्यमातून अनुभवलं देखील आहे.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे लग्न २०१७ मध्ये झालं,तर साक्षी आणि धोनीचं लग्न २०१० मध्ये झालं. एकदा अनुष्का शर्मानं एका मुलाखतीत म्हटलं होतं,''मी आणि साक्षी आसामच्या एका छोट्या शहरात राहत होतो. जेव्हा तिनं मला ती कुठे राहत होती हे सांगितलं तेव्हा मी तिला म्हणाली, व्वा,क्या बात..मी देखील तिथेच राहायचे''.

तेव्हा ती म्हणाली,''मी अमूक शाळेत जायचे तेव्हा मी देखील म्हटलं,मी देखील त्याच शाळेत शिकायचे''.

अनुष्का म्हणाली,यानंतर मला एक फोटो मिळाला ज्यात साक्षीनं परीचा ड्रेस घातला आहे आणि मी माझ्या फेव्हरेट माधुरी दिक्षितसारखं घागरा घातला आहे. साक्षी खूपच फनी होती शाळेत.

अनुष्काच्या वर्कफ्रंट विषयी बोलायचं झालं तर ती लवकरच चकदा एक्सप्रेसमध्ये दिसणार आहे. यात ती महिला क्रिकेटर झूलन गोस्वामीच्या भूमिकेत दिसणार आहे. अनुष्का शेवटची शाहरुख खान आणि कतरिना कैफ यांच्यासोबत झिरो सिनेमात दिसली होती. अनुष्काचा आगामी सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Success Story: गटविकास अधिकाऱ्यांची एमपीएससीत यशस्वी झेप; सोनल शहांची जीएसटी असिस्टंट कमिशनरपदी निवड, नाेकरी करत यशाला गवसणी!

Asaduddin Owaisi : मुस्लिमांनी नेतृत्व निर्माण करावे

IND vs NZ 1st ODI : विराट कोहली प्रेक्षकांवर भडकला! Rohit Sharma बाद झाल्यावर जे घडलं, ते अपेक्षित नाही; त्याला कसला राग आला?

Prajakt Tanpure:सत्ताधाऱ्यांचे हिंदुत्व बेगडी: माजी मंत्री प्राजक्त तनपुरे; पोलिस निरीक्षक पुजारी यांच्यावर कारवाई करा !

Dog Attack : फुरसुंगीत भटक्या श्वानाचा एकवीस जणांना चावा

SCROLL FOR NEXT