Anushka Sharma  esakal
मनोरंजन

बिस्किटच्या स्पेलिंगवरुन अनुष्का शर्मा झाली ट्रोल, अभिनेत्रीने मागितली माफी

बिस्किटच्या स्पेलिंगवरुन अनुष्का शर्मा झाली ट्रोल

सकाळ डिजिटल टीम

Anushka Sharma Get Trolled For The Wrong Spelling Of Biscuits : अभिनेत्री अनुष्का शर्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अनेकदा अभिनेत्री सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून लोकांना जागरूक करण्याचे काम करत असते. यावेळी अनुष्का शर्माने (Anushka Sharma) काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करताना दिसली. त्यामुळे ती पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

सध्या अभिनेत्री अनुष्का शर्मा तिच्या 'चकदा एक्स्प्रेस' चित्रपटासाठी इंग्लडला गेली आहे. येथे अनुष्का तिच्या आत दडलेले खाद्य समीक्षकाचे गुणे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. अनुष्का शर्माने अलीकडेच एका इंस्टाग्राम स्टोरीमध्ये सांगितले की, तिला बिस्किटे किती आवडतात, परंतु यावेळी ती स्वतः बिस्किटांची चव चाखणार नाही तर ती चवीची समीक्षाही करणार आहे. (Bollywood News)

अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये एका बॉक्समध्ये विविध प्रकारची बिस्किटे दिसत आहेत. प्रथम अनुष्काने जिम जॅम बिस्किट वापरून पाहिले. त्यानंतर अभिनेत्रीने लिहिले, मला त्यास ५ पैकी २ गुण द्यायचे आहेत. यापेक्षा चांगली चव भारतात मिळेल. आयताकृती बिस्किट चाखल्यानंतर, अभिनेत्रीने लिहिले की तुम्ही फक्त ते खाल्ल तर ते ठिक-ठिक आहे. पण यॉर्कशायर चहासोबत यमम आहे… मी त्याला ५ पैकी ३ गुण देईन.

शेवटी, बोरबाॅन चाखल्यानंतर, अभिनेत्री अनुष्का शर्माने बिस्किट रिव्ह्यू सत्राचा विजेता घोषित केला. रिव्ह्यू सेशनच्या सुरुवातीला अभिनेत्रीने बिस्किटचे चुकीचे स्पेलिंग लिहिले होते, ज्यामुळे लोकांनी अनुष्का शर्माला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

अनुष्काने तत्काळ माफी मागताना लिहिले, माझ्या चुकीच्या स्पेलिंगमुळे कोणी नाराज झाले असेल तर मी त्या सर्वांची माफी मागू इच्छिते, कृपया पुढे चला!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ, 4th T20I: श्रेयस अय्यरचा विश्वविक्रम, तर भुवीची जागा घेणाऱ्या मयंक यादवचे न्यूझीलंडला ५ ओव्हरमध्येच मोठे धक्के

Malegaon Commissioner ₹80000 Bribe Case : निवृत्तीला अवघे दोन दिवस उरले असताना मालेगाव महापालिकेचा आयुक्त एसीबीच्या जाळ्यात; 80 हजारांची लाच घेताना अटक

बापरे! तेजश्रीच्या पायाला गंभीर दुखापत? दीड महिन्यांपासून असलेलं फ्रॅक्चर दाखवत सांगितलं कारण

दुष्काळाचं सावट, रब्बी हंगामाची चिंता; शेतकऱ्यांसाठी महाबीजने आखलं ३.९८ लाख क्विंटल बियाण्यांचं नियोजन

Marathi News Live Updates : समृद्धी महामार्ग रोखून शेतकऱ्यांचे आंदोलन; आमदार नितीन देशमुख यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

SCROLL FOR NEXT