Actess Anushka sharma shared memories from kargil war days esakal
मनोरंजन

Kargil Vijay Diwas : वडील मला कारगील युद्धातून फोन करायचे,अनुष्का गर्वाने सांगते वडिलांचे किस्से

अनुष्काने अनेक मुलाखतींत तिच्या वडीलांबद्दल बोलत असते. १९८२ नंतर अनेक युद्धांत ते सहभागी होते. ते कारगील युद्द लढाईदेखील लढले आहे.

साक्षी राऊत

Kargil Vijay Diwas : बॉलीवुड अभिनेत्री अनुष्का शर्मा चाहत्यांच्या आवडत्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या जडणघडणात तिच्या वडीलांचा मोलाचा वाटा आहे असे ती कायम सांगत असते. अनुष्काचे वडील अजय कुमार शर्मा आर्मी ऑफिसर होते. अनुष्का अनेक मुलाखतींत तिच्या वडीलांबद्दल बोलत असते. १९८२ नंतर अनेक युद्धांत ते सहभागी होते. ते कारगील युद्ध लढाई देखील लढले आहे. (Actess Anushka sharma shared memories from kargil war days

जेव्हा कारगील युद्धातून फोन करायचे अनुष्काचे बाबा

एका मुलाखतीत अनुष्काने बालपणीच्या काही आठवणी सांगताना तिच्या वडीलांचा बालपणीचा किस्सा सांगितलाय. कारगील युद्धाचे ते दिवस होते. अनुष्का तेव्हा खूप लहान होती. तिच्या आईला बघून ती घाबरायची. ती सतत टीव्ही वरील न्यूज चॅनल बदलायची. युद्धात शहीद झालेल्या जवानांची टीव्हीवर आकडेवारी ऐकून ती अस्वस्थ व्हायची.

कारगील युद्धातून जेव्हा अनुष्काचे वडील तिला कॉल करायचे तेव्हा युद्धात असल्याने जास्त बोलायचे नाही. तरी अनुष्का तेवढ्या वेळात कॉलवर त्यांना तिच्या शाळेतल्या गप्पा, तिच्या बॉयफ्रेंडविषयी सगळं सांगायची. तेव्हा ते युद्धावर असायचे याची तिला जाणीव असावी एवढी ती वयाने मोठीही नव्हती.

'मी आर्मी ऑफिसरची मुलगी आहे' गर्वानं सांगते अनुष्का

अनुष्का शर्मा कायम सांगते की तिचं आणि तिच्या वडिलांचं एकमेकांशी फार जिव्हाळ्याचं नातं होतं. अनुष्का ज्या गोष्टी कोणालाच शेअर करायची नाही त्या फक्त तिच्या वडिलांना शेअर करायची. ती म्हणते, 'मी एक अभिनेत्री आहे यापेक्षा मी एका आर्मी ऑफिसरची मुलगी याचा मला जास्त गर्व आहे.'

अनुष्काचे इंस्टाग्रामवर तिच्या वडिलांसोबतचे बरेच फोटो आहेत . अनुष्का तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बरीच अॅक्टिव्ह असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानी लष्करावर हल्ला करण्याचा कट! कर्नाटकात तरुणाला अटक; कोण आहे असफुल मलिक?

घरात काम करणारीच्या मानेवर लव्ह बाइट; तिने बॉयफ्रेंडचं नाव सांगताच पूजा बेदी झालेली शॉक; निघाला अभिनेत्रीचा...

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भारताकडून वेल्सचा ३-१ असा पराभव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

SCROLL FOR NEXT