Anushka Sharma Google
मनोरंजन

विराटसोबत आनंदात संसार सुरु असताना अनुष्काला का आठवलं पहिलं प्रेम?

अनुष्कानं या 'पहिल्या प्रेमा'विषयी केलेल्या पोस्टमुळे सगळ्यांनाच चर्चेला विषय मिळाला आहे.

प्रणाली मोरे

अनुष्का शर्मा(Anushka Sharma)नं लग्न झाल्यानंतर तसं स्वतःला बॉलीवूडपासनं थोडं लांब ठेवलं. म्हणजे पूर्णपणे फारकत तिनं घेतली नव्हती हे खंरय,निर्माती म्हणून ती सक्रिय होतीच पण तिच्या सारख्या सर्वगुणसंपन्न अभिनेत्रीनं अभिनय करणं कमी केलं म्हणून, 'थोडं लांब ठेवलं' असं त्याअर्थाने म्हटलं आहे. ती लग्नानंतर तिच्या प्रॉडक्शन कंपनीमध्ये रमली. तिने ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी अनेक चांगल्या वेबसिरीजची निर्मिती केली. आता पुन्हा ती 'चकदा एक्सप्रेस' या तिच्या सिनेमाच्या माध्यमातून भेटीस येतेय त्यामुळे नक्कीच चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. अनुष्का सोशल मीडियावर तिच्यासंदर्भात नेहमीच अपडेट देत असते. त्यामुळे अर्थातच ती चर्चेतही असते. आता पुन्हा एकदा तिनं तिच्या पहिल्या प्रेमाविषयी केलेल्या पोस्टमुळे ती चर्चेत आली आहे. काय पोस्ट आहे नेमकी ती? सविस्तर वाचा

अनुष्कानं सोशल मीडियावर एक लांबलचक स्टेटमेंट पोस्ट केलंय. ज्यात तिनं म्हटलं आहे, ती तिच्या प्रॉडक्शन कंपनीमधून आता बाहेर पडतेय. आणि तिच्या पहिल्या प्रेमाला म्हणजे अभिनयाला ती वेळ देणार आहे. तिनं त्या पोस्टमध्ये लिहिलंय,''नवीन नवीन मातृत्वाची जबाबदारी आणि अभिनेत्री अशा दोन्हीत मला आता बॅलन्स साधायचा आहे''. तिनं आपला भाऊ कर्नेश शर्मावर कंपनीची जबाबदारी सोपवत आपण त्यातनं बाहेर पडणार असल्याचं सांगितलं आहे. ''भावावरआपला विश्वास आहे,आणि तो ही जबाबदारी चांगली पार पाडेल'' असंही ती म्हणाली आहे. तिनं आपल्या भावाला प्रॉडक्शन हाऊसच्या पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तिनं सोशल मीडियावर लिहिलेली पोस्ट इथे बातमीत जोडत आहोत

त्या पोस्टमध्ये तिनं कपंनीच्या स्थापनेपासून इथवरच्या प्रवासाचा आढावा थोडक्यात मांडला आहे. ''आम्हा बहिण भावाचं स्वप्न होतं अशी प्रॉडक्श कंपनी स्थापन करायची,काहीतरी करुन दाखवण्याची धमक अंगात होती. म्हणूनच मनोरंजन सृष्टीची आणि प्रेक्षकांची आवड लक्षात घेऊन नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या कलाकृतीच्या माध्यमातनं केला. कंपनी आता वाढतेय. माझा भाऊ आता त्याची जबाबदारी सांभाळणार आहे. त्याला खूप खूप शुभेच्छा''. अशी साधारण ती पोस्ट आहे. अनुष्का पुन्हा तिच्या पहिल्या प्रेमाकडे येतेय,अर्थात अभिनयाकडे वळतेय ही तिच्या चाहत्यांसाठी खुशखबर म्हणावी लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maruti Suzuki: मारुती सुझुकी इंडियाचे गुजरातमधील 'या' कंपनीसोबत विलीनीकरण होणार, एनसीएलटीकडून मोठी मान्यता

Mumbai News: मुंबईकरांना दिलासा वाहतूक कोंडीतून मिळणार! MMRDA ७० किमीचा भूमिगत बोगदा बांधणार, वाचा संपूर्ण प्लॅन

Ranji Trophy, Video: ६,६,६,६,६,६,६,६.... सलग ८ षटकार अन् वेगवान अर्धशतक; २५ वर्षीय भारतीय फलंदाजाने घडवला इतिहास

Matoshree Drone: मातोश्रीवरून ड्रोन उडवल्याचे प्रकरण; आदित्य ठाकरेंचे खळबळजनक दावे, ५ प्रश्न करत संशय व्यक्त केला, म्हणाले...

Shirur Crime : टाकळी हाजी येथे शेताच्या वादातून हल्ला; दोघे जखमी, लोखंडी गज व विटेचा वापर!

SCROLL FOR NEXT