मनोरंजन

'काशी के कलाकार का प्यार भरा सलाम'! सोनू सूदला चाहत्याने दिली अनोखी भेट

सकाळ वृत्तसेवा

मुंबई ः सध्या अभिनेता सोनू सूदचे सगळीकडे कौतुक होत आहे. अगदी राजकीय नेत्यांपासून ते सर्वसामान्य जनतेपर्यंत सोनू सूदचे नाव घेतले जात आहे. त्याने सध्याच्या हलाखीच्या दिवसात कित्येक गोरगरीबांना मदत केली आहे. एवढेच नाही तर नुकत्याच आलेल्या निसर्ग चक्रीवादळात सोनूने किनारपट्टीवर राहणाऱ्या जवळपास २८ हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले आणि त्यांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था केली.

आपल्या गावी परतणाऱ्या कित्येक मजुरांना त्याने मदतीचा हात दिला. त्यांना त्यांच्या गावी पोहोचविण्याची जबाबदारी त्याने घेतली आणि सरकारच्या परवानगीने त्यांना बसने गावी सोडले. आज सोनू सूद या सगळ्या मंडळींसाठी मसिहा ठरला आहे. त्यांच्या या मदतकार्यात त्याची पत्नी सोनालीदेखील त्याला मदत करीत आहे. मजुरांचे येणारे फोन आणि पत्ते लिहून घेणे आणि टीमला देऊन त्याची योग्य ती व्यवस्था लावणे आदी काम ती करीत आहे. एकूणच सोनूचे हे काम पाहून त्याला मजूर धन्यवाद देत आहेत. सोनूचे हे एकूणच कार्य पाहून आता काशीमधील एका कलाकाराने सोनूला एक अनोखी गिफ्ट पाठविली आहे. वाराणसी येथे राहणारा मूर्तिकार रुपेश सिंहने सोनूची एक मूर्ती रेतीमध्ये रेखाटली आणि त्याचा फोटो काढून सोनूला ट्विटरला पाठविला. त्यामध्ये त्याने एक मॅसेज लिहिला आहे

तो असा - गरीबांचा मसिहा सोनू सुदला काशीच्या कलाकाराचा प्यार भरा सलाम...त्या ट्विटला उत्तर देताना सोनूने म्हटले आहे की काशीच्या नागरिकांनो आता तुम्हाला भेटायला यावेच लागेल. याशिवाय ओरिसा येथील आर्टिस्ट सुदर्शन पटनायक यांनीही तेथील बीचवर रेतीमध्ये सोनूचे चित्र रेखाटले आहे आणि लिहिले आहे यू आर दी रिअल हिरो...सोनू सूद.  सोनूने त्यालाही आपल्या सोशल मीडियावरून मॅसेज पाठविला आहे. लवकरात लवकर भेटूच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT