AR Rahman birthday he says he contemplated suicide till age 25  sakal
मनोरंजन

A R Rahman: अपयशाने खचलेले ए. आर. रहमान करणार होते आत्महत्या.. आज आहे संगीताचा बादशाह..

जगतविख्यात भारतीय संगीतकार ए आर रहमान यांचा आज वाढदिवस, त्या निमित्ताने जाणून घेऊया ही खास बात..

नीलेश अडसूळ

हिंदी चित्रपटांतील प्रसिद्ध संगीतकारांपैकी एक असलेले ए.आर रहमान (A R Rahman) आज सिनेविश्वात एका वेगळ्याच टप्प्यावर आहेत. ऑस्करवर नाव कोरणाऱ्या या संगीत दिग्दर्शकाची बॉलीवुड, टॉलीवूड नाही तर हॉलीवुडमध्येही चर्चा आहे. ज्यांच्या संगीताने अवघं जग वेडं केलं अशा गोल्डन ग्लोब पुरस्कार (Golden Global Award) मिळविणाऱ्या या पहिल्या भारतीय संगीतकाराचा आज वाढदिवस आहे. (AR Rahman birthday he says he contemplated suicide till age 25 )

आज जरी ते एक यशस्वी संगीत दिग्दर्शक असले तरी एक वेळ अशी होती ही अपयशाने ते खचून गेले होते. अशावेळी त्यांनी आत्महत्येचा विचार केला, पण त्यापासून ही मागे आले आणि आज जे घडलय तो उद्याचा इतिहास असणार आहे.

1967 मध्ये तामिळनाडूमध्ये जन्मलेला रहमान हे आज 56 वर्षांचे झाले आहेत. आपल्या कर्तृत्वाने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे मूल्य उंचावणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाला वडिलांकडून संगीताचा वारसा लाभला आहे. त्यांचे वडील आर.के. शेखर (R.K Shekhar) मल्याळम चित्रपटांना संगीत द्यायचे.

हेही वाचा - द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

वयाच्या 11 व्या वर्षापासून संगीतासोबत वेळ घालवणाऱ्या रहमान यांचे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. 'स्लम डॉग मिलेनियर' (Slumdog Millionaire) या ब्रिटिश भारतीय चित्रपटातील संगीतासाठी तीन ऑस्कर नामांकने (Oscar Nominations) मिळवणारे ए.आर. रहमान हे पहिले भारतीय आहेत.

एआर रहमाननी 1991 मध्ये स्वतःचे संगीत रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली. त्यांना चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम (Manirattnam) यांनी त्यांच्या 'रोजा' चित्रपटासाठी संगीत देण्याची संधी दिली. हा चित्रपट म्युझिकली सुपर हिट ठरला आणि पहिल्याच चित्रपटात रहमाननी फिल्मफेअर (Filmfare) पुरस्कार जिंकला होता.

पण वयाच्या 25 व्या वर्षी रहमाननी आत्महत्येचा विचार केला होता. कारण त्यांना कुठेच संधी मिळत नव्हती. त्यात त्यांच्या आई वडिलांचे निधन झाल्याने ते पूर्णतः एकाकी पडले होते. शिवाय कुटुंबाची जबाबदारीही त्यांच्यावरच होती. अशा परिस्थितीत संगीत क्षेत्रातून त्यांना काम मिळत नसल्याने ते खचून गेले होते. त्यांनी आत्महत्येचा विचारही केला पण मग कुटुंबाकडे पाहून ते मागे फिरले आणि जिद्दीने कामाला लागले.

'रोजा' पासून त्यांची सुरुवात झाली आणि ते पुढे थांबलेच नाहीत. त्यांनी आजवर अनेक हीट सिनेमे दिले. तेहजीब (Tehjaab), बॉम्बे (Bombay), दिल से (Dil Se), रंगीला (Rangila), ताल (Taal), जीन्स (Jeans), पुकार (Pukar), फिजा (Fiza), लगान (Lagaan), मंगल पांडे (Mangal Pande), स्वदेश (Swades), रंग दे बसंती (Rang De Basanti), जोधा-अकबर (Jodha-Akbar), जाने तू या जाने ना (Jane Tu Ya Jane Na), युवराज (Yuvraj), स्लम डॉग मिलेनियर, गजनी (Gajni) यांसारख्या चित्रपटांना त्यांनी उत्कृष्ठ संगीत दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Capital IPO: 'टाटा'च्या आयपीओचा धमाका! सामान्यांसाठी खुला होण्यापूर्वीच बड्या कंपन्यांची मोठी गुंतवणूक

Arattai messaging app : स्वदेशी मेसेजिंग ॲप ‘Arattai’ची क्रेझ वाढली! ; आता आनंद महिंद्रांनीही केलंय डाउनलोड

Barshi Crime : बार्शीत एसटी महामंडळ बसच्या महिला वाहकास मारहाण; सहा महिलांविरुद्ध गुन्हा

Akola News : खदान पोलीस स्टेशनमधील नितीन मगर निलंबीत, डीबी स्कॉडवर पुन्हा संशयाची सावली

Latest Marathi News Live Update: वृद्ध महिलेच्या गळ्यातील चेन हिसकावणारा सराईत चोरटा गजाआड

SCROLL FOR NEXT