A.R.Rahman tweet  esakal
मनोरंजन

A.R.Rahman : 'नव्या पिढीची मला कीव येते'! ऑस्कर विजेते रहमान असं का म्हणाले?

आता रहमान यांची एक प्रतिक्रिया सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. रहमान हे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारे सेलिब्रेटी आहेत.

युगंधर ताजणे

AR Rahman oscar winner viral video tweet china school : भारताचे ऑस्कर विजेते संगीतकार ए आऱ रहमान यांचे भारतीय संगीतातील योगदान मोठे आहे. केवळ भारतच नाहीतर जगाच्या पाठीवर त्यांचे असंख्य चाहते आहे. रहमान यांचे संगीत जात, धर्म, यासगळ्याच्या भिंती ओलांडून मानवजातीशी संवाद साधण्याचे काम करते. त्यामुळेच की काय रहमान यांच्या येणाऱ्या नवीन गाण्याविषयी, संगीत रचनेबाबत त्यांच्या चाहत्यांना कमालीची उत्सुकता असल्याचे दिसून आले आहे.

आता रहमान यांची एक प्रतिक्रिया सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. रहमान हे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारे सेलिब्रेटी आहेत. ट्विटवर तर ते देशभरातील वेगवेगळ्या घडामोडींवर स्पष्टपणे भाष्य करताना दिसतात. आरआऱआऱला जेव्हा ऑस्करनं गौरविण्यात आले तेव्हा सर्वप्रथम रहमान यांनी आरआऱआऱच्या टीमचे कौतूक केले होते. भारतीय संगीत आणि नृत्य परंपरेचा मोठा गौरव झाला आहे. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.

Also Read -Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

रहमान हे त्यांच्या परखड स्वभावाबद्दल ओळखले जातात. त्यांनी सोशल मीडियावर आता केरळमधील एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये एका मशिदीमध्ये हिंदू सात फेरे घेताना दिसत आहे. तो आर्टिफिशयल इंटेलिजन्सला उद्देशून असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याशिवाय रहमान यांनी चीनमधील एक व्हिडिओ शेयर करुन त्या देशामध्ये कॉम्प्युटर सायन्स आणि टेक्नोलॉजी कशाप्रकारे प्रगती करत आहे, आपल्या मनाचा कशाप्रकारे ताबा घेत आहे हे सांगितले आहे. याप्रकारामुळे रहमान यांची चिंता वाढली आहे. त्यांनी तो व्हिडिओ शेयर केल्यानंतर अनेकांनी रहमान यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला आहे.

तो व्हिडिओ वॉल स्ट्रीट जर्नल यांच्याकडून बनवला गेला आहे. त्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे की, शाळा, महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता मोजण्यासाठी त्या ए आय प्रणालीचा उपयोग केला जात आहे. शाळेतील मुलांनी हातामध्ये आर्टिफिशयल इंटेलिजन्स हँडबँड परिधान केल्याचे दिसत आहे. हे सगळं पाहिल्यानंतर रहमान यांनी आपल्याला या पिढीची खूप दया येत असल्याचे म्हटले आहे. ही पिढी एका ठराविक मर्यादेत राहणार असून ती शापित आहे असेही त्यांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

Tata Tiago 2026 : पेट्रोल-CNG-EV एकत्रच लाँच; टाटाची सर्वात स्वस्त कार, सेफ्टी फिचर्सही वाढवली

"प्रयोग गेले, चित्रपट गेला आणि मी तोंडावर पडले" लक्ष्मीनिवास फेम अभिनेत्रीने सांगितला तिला आलेला विचित्र अनुभव

माकडामुळे गावात ६ दिवस लॉकडाऊनसारखी स्थिती, हल्ल्यात ७० जण जखमी; ५ ते ७ जण गंभीर

Panvel Flood Risk: पनवेलला पुराचा धोका? विमानतळासाठी भराव, बदललेल्या नदीपात्रामुळे संकट ओढावण्याची भीती

SCROLL FOR NEXT