arjun kapoor and malaika arora  esakal
मनोरंजन

मलायकाचं पहिलं लग्न आणि मुलाबाबत व्यक्त झाला अर्जुन कपूर; म्हणाला..

बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी

प्रियांका कुलकर्णी

बॉलिवूडमधील सध्याची सर्वात चर्चेत असणारी जोडी म्हणजे मलायका अरोरा Malaika Arora आणि अर्जुन कपूर Arjun Kapoor. अभिनेता अरबाज खानला Arbaaz Khan घटस्फोट दिल्यानंतर मलायका आणि अर्जुनच्या अफेअरची चर्चा सुरू होती. मलायका आणि अर्जुनने 2019 मध्ये त्यांच्या नात्याची अधिकृतपणे घोषणा केली होती. अर्जुन अनेक वेळा त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलणे टाळतो. मात्र नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अर्जुनने मलायकाबाबत काही गोष्टींचा खुलासा केला आहे. (arjun kapoor on respecting malaika arora past dating someone older with son from earlier marriage)

एका मुलाखतीत अर्जुनला विचारण्यात आले की, 'तुझ्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या तसेच घटस्फोट झालेल्या आणि एका मुलाची आई असलेल्या मलायकासोबत रिलेशनशिपमध्ये येताना तू काय विचार केला होतास?' या प्रश्नाला अर्जुनने उत्तर दिले, 'मी आमच्या दोघांमध्ये एक आदरयुक्त सीमा ठेवली आहे. तिला जे आवडते ते ती करते आणि तेच मी करतो. माझ्या मलायकासोबतच्या रिलेशनशिपचा परिणाम मी कधीच करिअरवर होऊ देणार नाही. त्यामुळे करिअरसाठी मला काही मर्यादा सांभाळाव्या लागतात. मी याबद्दल आज बोलत आहे कारण मला या नात्याबद्दल आदर आहे. आम्ही एकमेकांना वेळ देत आहोत. मी मलायकाला तिच्या आयुष्यात स्पेस देतो.'

मलायका आणि अर्जुन बऱ्याचवेळा सोशल मीडियावर त्यांचे रोमॅंटिक फोटो शेअर करत असतात. गेल्या वर्षी एका मुलाखतीत अर्जुनने सांगितले होते, 'माझा लग्न करण्याचा निर्णय मी कधीच लपवणार नाही. पण लग्नाबद्दल अजून तरी काही विचार केला नाही आणि केला तरी तो सर्वांना सांगेन, लपवणार नाही.'

मलायकाचा आणि अभिनेता अरबाज खानचा घटस्फोट 2017 साली झाला. मलायका आणि अरबाजला एक मुलगा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 3rd Test: रिषभ पंत आर्चरचा लॉर्ड्सवर सामना करण्याबद्दल म्हणाला, 'तो परत येण्याचा मला...'

Video: मी इथेच आहे, तुझ्यासोबत! पत्नी आयसीयूमध्ये, पतीने हात धरला अन्...; वृद्ध जोडप्याचा व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

Viral Video: कसाबसा जीव वाचला! रस्त्याची पाहाणी करायला आलेल्या अभियंत्यासमोरच कोसळला ट्रक, जीव वाचवण्यासाठी लोकांची पळापळ

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

SCROLL FOR NEXT