Arjun Rampal Girlfriend Gabriella Demetriades esakal
मनोरंजन

Arjun Rampal: अर्जुन रामपाल झाला चौथ्यांदा बाबा! गर्लफ्रेंडनं दिली गोड बातमी

Vaishali Patil

Arjun Rampal Baby Boy: बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल हा त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. मात्र तो त्याच्या व्यावसायिक कामापेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असतो. आज अर्जुन रामपालला गोड बातमी मिळाली आहे.

त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्स दुसऱ्यांदा आई बनली आहे. अर्जुन रामपाल आणि मैत्रीण गॅब्रिएलानं गुरुवारी म्हणजेच 20 जुलै रोजी त्यांच्या दुसऱ्या मुलाचं स्वागत केले. या कपला आधी एक मुलगा आहे. अर्जुनने त्याच्या चाहत्यांनसोबत ही गोड बातमी शेयर केली आहे.

अर्जुनने त्याच्या ट्विटरला ही माहिती शेयर केली आहे. त्यात त्याने लिहिले की, मला आणि माझ्या कुटुंबाला आज एका सुंदर मुलाचा आशीर्वाद मिळाला आहे. आई आणि मुलगा दोघेही चांगले आहेत. तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल खुप आभार.. यासोबतच त्याने एक फोटोदेखील शेयर केला आहे. त्याचे चाहते त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव करत आहे.

अर्जुन रामपाल आणि गॅब्रिएला यांची पहिली भेट एका आयपीएल सामन्यादरम्यान झाली त्यानंतर ते एकमेंकाना भेटू लागले. दोघे 2009 मध्ये पहिल्यांदा भेटले होते. त्यानंतर ते प्रेमात पडले.

गॅब्रिएलासाठी अर्जुन रामपालनं त्याचा 20 वर्षाचा संसार मोडला आणि मे 2018 पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला. आता तो मॉडेल गॅब्रिएला सोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये आहे. या जोडप्याला आता दोन मुले आहेत.

तर अर्जुन रामपाल आणि मेहर जेसिया यांना माहिका आणि मायरा या दोन मुली आहेत. दोघेही वडिलांच्या खूप जवळचे आहेत.

अर्जुनच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो शेवटचा कंगना राणौत विरुद्ध 'धाकड' या अॅक्शन चित्रपटात दिसला होता. आता तो अब्बास मस्तानच्या आगामी 'पेंटहाउस' चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय अर्जुन 'क्रॅक' या स्पोर्ट्स अॅक्शन चित्रपटात दिसेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT