Arjun reddy fame vijay to debut in Bollywood with karam johar movie  
मनोरंजन

अर्जुन रेड्डीची बॉलिवूडमध्ये एन्ट्री !

वृत्तसंस्था

मुंबई : हिंदी, मराठी आणि दाक्षिणात्या चित्रपटांची शर्यतही सुरु असते. यामध्ये सर्वात चांगले कोण हे ठरवणे अशक्य आहे कारण, सर्वांच वैशिष्ठ्य वेगळं आहे. यामधील हिंदी कलाकार साऊथ चित्रपटांमध्ये तर, साऊथचे अनेक कलाकार बॉलिवूडमध्ये झळकताना दिसतात. साऊथच्या आणखी एका स्टारची बॉलिवूडमध्ये एन्ट्री होणार आहे. 'अर्जुन रेड्डी' या लोकप्रिय चित्रपटाचा हिरो म्हणजेच विजय देवरकोंडा हा लवकरच हिंदी बोलताना दिसणार आहे. 

विजय देवरकोंडा हा लवकरच हिंदी चित्रपटातून झळकणार आहे. 'अर्जुन रेड्डी' या चित्रपटाने साऊथमध्ये आणि तेवढीच लोकप्रियता बॉलिवूडमध्येही मिळाली. 'अर्जुन रेड्डी'चा रिमेक आला तो 'कबीर सिंग' च्या रुपाने. खरंतर या कबीर सिंग या रिमेकसाठी विजयला विचारण्यात आले होते. पण, या चित्रपटासाठी त्याने नकार दिला. शेवटी शाहिदने कबीर सिंग केला आणि ओरिजिनल 'अर्जुन रेड्डी' ला न्याय देण्याचा प्रयत्न केला. 
आता मात्र विजय करण जोहरच्या चित्रपटातून दिसणार आहे.

तेलुगुमधील ‘डिअर कॉम्रेड’ या चित्रपटाचा रिमेक करण तयार करतोय यामध्ये मुख्य भूमिकेत विजय दिसणार आहे. ‘डिअर कॉम्रेड’ च्या हिंदी रिमेकमध्ये विजय असणार असल्याची घोषणा करणने स्वत: केली आहे. या चित्रपटामध्ये 'बाहुबली' फेम अभिनेत्री रम्या कृष्णनही असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed: गरोदर महिलेच्या पोटात ३० तास मृत बाळ; उपचारासाठी चालढकल, बीडमध्ये गंभीर प्रकार

India Pakistan Cricket Match: भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या 'त्या' नववधुने केलं मोठं विधान!

Pro Kabaddi 12: पवन सेहरावतची हकालपट्टी! तमिळ थलायवाजने कर्णधाराला घरी पाठवण्याचं दिलं स्पष्टीकरण

Asia Cup 2025: बीसीसीआय भारत-पाकिस्तान सामना रद्द करू शकतं का? नेमका नियम काय आहे? वाचा...

Latest Marathi News Updates: मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांच्या नावे अज्ञाताकडून संभाजीनगरमध्ये होर्डिंग

SCROLL FOR NEXT