Arpita Khan 
मनोरंजन

सलमानची बहिण म्हटल्यावर काय बोलायचं!, मुंबईत 10 कोटींचं घर

बॉलीवूडचा भाईजान म्हणून सलमानची वेगळी (Salman Khan) ओळख आहे.

सकाळ डिजिटल टीम

Bollywood News: बॉलीवूडचा भाईजान म्हणून सलमानची वेगळी (Salman Khan) ओळख आहे. तो त्याच्या वादग्रस्त अभिनयासाठीही त्याच्याकडे पाहिलं जातं. सलमाननं गेल्या वर्षी त्याचा अंतिम नावाचा (Bollywood Actor) चित्रपट प्रदर्शित केला होता. मराठी हिंदी चित्रपट (Entertainment News) विश्वातील मोठे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. मात्र हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आदळला. तो फारसा प्रेक्षकांना आवडलाही नाही. त्यात सलमानच्या मेव्हण्यानं चाहत्यांची पसंती मिळवली होती. सध्या सलमानची बहिण अर्पिता ही चर्चेत आली आहे. तिनं मुंबईमध्ये तब्बल 10 कोटींचे घर खरेदी केल्याची बातमी समोर आली आहे. Salman Khan Sister Arpita Khan Take New Home yst88

अर्पिता खान शर्मानं (Arpita khan Sharma) मुंबईमध्ये जवळपास पावणेदोन हजार स्क्वेअर फूटांचे घर खरेदी केले आहे. त्यामध्ये 4 फोर व्हिलरसाठी पार्किंग आहे. तिनं हे घर 10 कोटीं रुपयांना खरेदी केले आहे. मुंबईतील खारच्या पश्चिम भागात हे घर आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 व्या मजल्यावर हा फ्लॅट असून त्याचे रजिस्ट्रेशन 4 फेब्रुवारी रोजी झाले. अर्पितानं या घरासाठी 40 लाखांची स्टँम्प ड्युटी दिली आहे. या अपार्टमेंट विषयी सांगायचे झाल्यास त्यामध्ये केवळ तीन आणि चार बीएचकेंची घरं उपलब्ध आहेत. त्यांचा स्क्वेअर फीट एरिया हा 60 ते 65 हजार एवढा आहे. या भागातील प्रॉपर्टीचे महिन्याचे रेंट दीड ते दोन लाख रुपये महिना आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी अशी बातमी समोर आली होती की, सलमाननं मुंबईतील त्याची एक प्रॉपर्टी भाड्यानं दिली होती. त्याचे महिन्याचे भाडे 95 हजार एवढे आहे. एका मुलाखतीमध्ये अर्पितानं सांगितले होते की, मी सोहेल खानच्या सर्वात जवळ आहे. आम्ही दोघेही एकत्रच मोठे झालो. दुसरीकडे सलमान हा मला वडिलांसमान आहे. त्याच्याप्रती माझ्या हदयात आदराचे स्थान आहे. अभिनेता आयुष शर्मा आणि अर्पिता खान यांनी 2014 मध्ये लग्न केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT