Aryan Khan Comeback On Instagram, Shahrukh Reaction Viral Google
मनोरंजन

आर्यननं वर्षभरानं इन्स्टावर पोस्ट केले फोटो; शाहरुख म्हणाला,'आत्ताच्या आता...'

ड्रग्ज प्रकरणात अडकल्यानंतर आर्यन खान सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरनं गायबच झाला होता.

प्रणाली मोरे

Aryan Khan Comeback On Social Media: बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खानचा(Shah rukh khan) मोठा मुलगा आर्यन खान सोशल मीडिया(Social Media) आणि लाइमलाइटपासून गेले अनेक महिने दूर होता. आर्यन खान तसा बॉलीवूडमधला पॉप्युलर स्टार किड आहे. पण त्याला लाइमलाइटमध्ये राहणं फारसं पसंत नाही. तसंही हे खूप कमी वेळा घडतं जेव्हा आर्यन खान सोशल मीडियावर काही शेअर करतो. पण आता तो खास क्षण आला आहे की जेव्हा आर्यन खानने सोशल मीडियावर एक हॅप्पीवाला फोटो शेअर केला आहे.(Aryan Khan Comeback On Instagram, Shahrukh Reaction Viral)

खूप कालावधीनंतर आर्यन खान इन्स्टाग्रामवर परत आला आहे. आर्यन खानने आपल्या भावा-बहिणीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. सुहाना,अब्राहम आणि आर्यन तिघंही भावंड खूप हॅप्पी मूडमध्ये त्या फोटोत दिसत आहेत. फोटोमध्ये आर्यन,बहिण सुहाना आणि धाकटा भाऊ अब्राहम यांनी खास पोझ देत फोटो क्लिक केला आहे. सुहाना आणि अब्राहमच्या चेहऱ्यावरील गोड स्माईल जितकं लक्ष वेधून घेते तितकाच आर्यनच्या चेहऱ्यावरील थोरल्या बंधूच्या अहिर्भावातला अंदाजही लोकांना कमेंट द्यायला मजबूर करतो. त्या फोटोत आर्यन खान ऑलिव्ह ग्रीन कलरचा शर्ट,ब्लॅक जीन्स आणि लाइट ग्रीन डेनिम जॅकेट घालून दिसत आहे. तर सुहाना डेनिम लूक मध्ये आणि अब्राहमने ब्लॅक हुडी आणि ब्लू डेनिम परिधान केलं आहे.

एका फोटोत अब्राहम आणि आर्यन खान एकत्र दिसत आहेत. फोटोत आर्यन हॅंडसम दिसतोय तर अब्राहमच्या क्यूट स्माइलवर नजरा खिळल्या आहेत. या फोटोंना लाखो नेटकऱ्यांनी पसंती दर्शवली आहे तर सोशल मीडियावर फोटो व्हायरल देखील झाला आहे. आर्यन बऱ्याच दिवसांनी सोशल मीडियावर आल्यानं चर्चेतही आला आहे.

आर्यनच्या या फोटोवर लोक खूप चांगल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत. सुहाना खानने देखील फोटोवर कमेंट देताना लिहिलं आहे,'लव्ह यू'. तर हार्ट इमोजी देखील तिनं शेअर केला आहे. सुहानाने जेव्हा पाहिलं की दुसऱ्या फोटोत ती नाही तेव्हा तिनं मोठा भाऊ आर्यनला टोमणा मारत लिहिलं की,'मला फोटोतून काढून बाजूला केलं त्यासाठी धन्यवाद'.

आता आपल्या मुलांच्या या फोटोवर कमेंट करायची संधी शाहरुख कसा सोडेल बरं. त्याने देखील एक मजेदार कमेंट फोटोवर केली आहे. त्यानं लिहिलं आहे,'माझ्याकडे हे फोटो का नाहीत, मला आत्ताच्या आता हे फोटो हवेत'.

कितीतरी चाहते आर्यनच्या फोटोवर कमेंट करत आहेत. एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की, 'एका फ्रेममध्ये सगळे एकत्र खूप क्यूट दिसत आहेत'. दुसऱ्या एकानं कमेंट केली आहे की,'तुम्हा सगळ्यांना एकत्र पाहून खूप छान वाटलं'. अर्थातच जवळपास वर्षभरानं आर्यनने इन्स्टाग्रामवर कमबॅक केलं आहे त्यामुळे त्याचे चाहते खूश होणार हे तर ओघानं आलंच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT