aryan khan Esakal
मनोरंजन

Aryan Khan: "2 लाखांचं जॅकेट अन्...", आर्यनच्या लग्झरी ब्रँडच्या किंमती वरून भन्नाट मीम्स व्हायरल

Vaishali Patil

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या हा नेहमी चर्चेतच असतो. काही न करता त्याच्या चाहत्यांची संख्या बरिच आहे. काही दिवसांपुर्वी आर्यनने कपड्यांच्या ब्रँडची घोषणा केली होती. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा लग्झरी क्लोदिंग ब्रँड D'YAVOL X गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे.

त्यांची जाहिरातही बरिच व्हायरल झाली. कारण या जाहिरीतीत आर्यन खान त्याचे वडिल शाहरुख खान देखील दिसला. आर्यनने स्वतः या जाहिरातीचे दिग्दर्शन केले होते ज्यामुळे तो चर्चेत राहिला.

पण आता या ब्रँडची वेबसाइट रविवारी लाईव्ह झाली आहे, ज्यामध्ये D'YAVOL X या ब्रँडची साईट ओपन होताच लेटेस्ट ब्रँड्सचे कपडे पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी अचानक जमली. चाहत्यांच्या आवडीनुसार अनेक ब्रँडचे हुडीज आणि टी-शर्ट D'YAVOL X वर उपलब्ध आहेत . काही चाहत्यांनी कपडे खरेदीही केले तर काहींना त्यांची किंमत पाहून धक्काच बसला.

इतकेच नाही तर कपड्यांच्या किमतीवर सोशल मीडियावर फनी मीम्सही सातत्याने व्हायरल होत आहेत.

कपड्यांची किंमत पाहून काही चाहत्यांनी ट्विटरवर आपली प्रतिक्रियाही शेअर केली. कपड्यांच्या किमतीची डिटेल ट्विटरवर शेअर करताच मीम्स व्हायरल होऊ लागले.

शाहरुखच्या फॅन क्लबकडून एक फोटो शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये फॅन क्लबकडून चार टी-शर्ट ऑर्डर करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. XL आकाराच्या DyavolX डक टी-शर्ट 48,800 रुपये, XL आकारातील अल्फा टी-शर्ट 45,500 रुपये, सिग्नेचर X टी-शर्ट एल आकारात 4,01,110 रुपये आणि सिग्नेचर X टी-शर्ट लहान आकारात 200, 555 रुपये. त्यांची एकूण किंमत 6,95,965 रुपये आहे.

तर दुसऱ्या यूजरने लिहिले की, " ही काय किंमत आहे का ? 33 हजारांचा टी-शर्ट, 45 हजारांची हुडी आणि दोन लाखांच जॅकेट." तर ऐकानं लिहिलयं, "#DyavolX हे आमच्या मध्यमवर्गीय लोकांसाठी नाही. मी @iamsrk वरून काही खरेदी करू शकत असल्यास ती #JAWAN च्या तिकिटाची किंमत आहे.

स्वतःचा लग्झरी क्लोदिंग ब्रँड उघडल्यानंतर आर्यन खान दिग्दर्शनातही पदार्पण करणार आहे. तो एका वेब सीरिजचे दिग्दर्शन करत आहे. याआधी त्याने 'द लायन किंग'मधील सिम्बाच्या व्यक्तिरेखेसाठी व्हॉईस ओव्हर दिला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Heavy Rain Alert : मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार ! महाराष्ट्रासह १७ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Tamil Nadu Politics: तमिळनाडूत मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा; अण्णा द्रमुकचे १० आमदार ‘टीव्हीके’च्या संपर्कात, १५ ऑगस्टपूर्वी पक्षांतराची शक्यता

Latest Marathi News Live Update : थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये भीषण दुर्घटना; पबला लागलेल्या आगीत 27 जणांचा होरपळून मृत्यू, अनेकजण जखमी

Police Constable Death : चंदगड पोलिस ठाण्यात खळबळ! ड्युटी संपवून घरी परतलेल्या 32 वर्षीय तरुण पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू; 3 वर्षांची चिमुरडी पोरकी

Akola: बोगस बियाणे प्रकरणी कंपन्यांना दणका; दोन कंपन्यांवर गुन्हे दाखल; कृषी विभागाची कारवाई

SCROLL FOR NEXT