asha bhosle son anand shinde hospitalized sakal
मनोरंजन

Asha Bhosle : आशा भोसले दुबईत! मुलाची प्रकृती चिंताजनक...

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या मुलाची प्रकृती बिघडली असून त्या सध्या दुबईत रवना झाल्या आहेत. सध्या त्यांची प्रकृती..

नीलेश अडसूळ

ज्येष्ठ गायिका आशा भोसले (asha bhosle) यांना अचानक दुबईत रवाना व्हावे लागले आहेत,. त्यांच्यावर सध्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे. काही महिन्यापूर्वीच आशा यांच्या मोठ्या भगिनी ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांचे निधन झाले. या निधनाने मोठा धक्का आशा भोसले यांना बसला होता. काही दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमात आशा भोसले लता दीदींविषयी बोलताना भावुक झाल्या. त्यांना अश्रू अनावर झाले. अत्यंत कठीण प्रसंगातून त्या जात असतानाच आता मुलांच्या प्रकृतीची काळजी त्यांना सतावत आहे.

आशा भोसले यांचा धाकटा मुलगा आनंद भोसले (anand bhosle) याला दुबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आहे. आनंद अचानक बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळले. यात त्यांना किरकोळ दुखापतही झाली. आनंद यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. परंतु सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना जनरल वॉर्ड मध्ये आणले असल्याची माहिती काही माध्यमांनी दिली आहे. त्यांच्या प्रकृतीची वार्ता समजताच आशा भोसले दुबईत गेल्या. सध्या आशाताई मुलासोबतच असून त्यांची काळजी घेत आहेत. (asha bhosle son hospitalized)

आशा भोसले यांना तीन मुले आहेत. आशाताईंचा मोठा मुलगा हेमंत भोसले (hemant bhosle) यांचं वयाच्या ६६ व्या वर्षी कर्करोगाने निधन झालं. हेमंत हे निधनाच्यावेळी स्कॉटलंडमध्ये रहात होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हेमंत भोसले यांनी अनेक चित्रपटांसाठी गाणी रचली आणि संगीत नाटक अकादमीपासून फिल्मफेअर आणि २ राष्ट्रीय पुरस्कारही जिंकले होते. २०१२ मध्ये आशा भोसले यांची मुलगी वर्षा यांनी आत्महत्त्या केली. वर्षा भोसले यांनी घरातील परवानाधारक पिस्तुलाने स्वतावर गोळ्या झाडून घेतल्या होत्या. डिप्रेशनमध्ये येऊन त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगितलं जातं. (asha bhosle son anand bhosle hospitalized)

दोन मुले गमावल्याने आशा भोसले यांना आनंद यांची विशेष चिंता सतावत असते. आनंद भोसले हे व्यवसायिक आहेत शिवाय ते चित्रपट दिग्दर्शन करतात. आनंद यांना अचानक चक्कर आल्याने अशा भोसले यांच्या चिंतेत मोठी वाढ झाली आहे. ही चक्कर नेमकी कशामुळे आली, काय झाले, याचे तपशील अद्याप मिळालेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sand Mining Ban: राज्यात अवैध वाळू उपसा बंद करण्याचे आदेश; मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका निकाली

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण मध्ये आज बंजारा समाजाच्या वतीने एल्गार मोर्चा काढण्यात आला

Dasara 2025: कंबरेला दोरी बांधून ७७ वर्षीय पुजाऱ्याने ओढल्या बारा बैलगाड्या; बिरोबाचा पारंपारिक दसरा महोत्सव

Shivaji Maharaj Video: छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील रिझर्व बँक पाहिली का? व्हिडिओ व्हायरल

Video: रावणाची दहा डोकी घेऊन फिरत होती राखी सावंत, अशाच अवतारात छम्मक छल्लो गाण्यावर नाच नाच नाचली, व्हिडिओ बघून तुम्ही पण हसाल

SCROLL FOR NEXT