Asha Parekh Google
मनोरंजन

Asha Parekh @79: ''मला लग्नाची मागणी कधी कोणी घातलीच नाही कारण...''

ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांनी नुकतच एका मॅगझीनच्या कव्हर पेजसाठी फोटोशूट केलं आहे.

प्रणाली मोरे

ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख(Asha Parekh) यांनी बॉलीवूड(Bollywood)मध्ये एक काळ राज्य केलंय. आजही त्यांना सत्तरीच्या दशकातल्या सुपरस्टार म्हणूनच संबोधलं जातं. बॉलीवूडमध्ये त्यावेळच्या अनेक दिग्गज हिरोंना त्या टक्कर द्यायच्या. पुरुषप्रधान संस्कृती असलेल्या त्यावेळच्या बॉलीवूड सिनेमांत आशा पारेख यांचा दरारा अनेकांनी अनुभवलाय. दिसायला देखणी,अभिनयात दर्जा,नृत्यात पारंगत अशा आशा पारेख आज वयाच्या ८० व्या टप्प्यावर असल्या तरी त्यांच्या सौंदर्यात तसूभरही कमतरता दिसत नाही याचं काय बरं रहस्य असेल हे नुकतच त्यांनी सांगितलंय ते एका मॅगझीनच्या कव्हर फोटोसाठी शूट करण्याच्या निमित्तानं.

मॅगझीनच्या कव्हर फोटोवर पोझ देताना आशा पारेख यांची दूरवर पाहणारी नजर कॅमऱ्यानं अचूक टिपलीय. शांत,संयमी,नावाप्रमाणेच आशादायक,उत्साहांन भारलेली ती नजर खूप काही शिकवून जातेय. त्या फोटोत खांद्यापर्यंतचे पांढरेशुभ्र केस आणि हलकासा मेकअप त्यांच्या चेहऱ्याची शोभा वाढवत आहे. काळ्या रंगाचा टॉप अन् गळ्यात मोत्यांचा हार त्यांना शोभून दिसतोय. साधेपणातही सौंदर्य किती खुलून येतं याचं उदाहरण आशा पारेख या फोटोतून दाखवून देतायत. याच फोटशूटच्या निमित्तानं त्यांनी आपल्या लग्न न करण्याविषयीचा खुलासा केलाय.

आशा पारेख म्हणाल्यात,''मला लग्न करायला आवडलं असतं पण ते केलं नाही याची मला मुळीच खंत नाही''. आशा पारेख यांनी साठ-सत्तरीच्या दशकात बॉलीवूडमधील अनेक सिनेमांतून काम केलंय आणि अनेक सुपरहिट सिनेमे आपल्या नावावर केलेयत. 'जब प्यार किसीसे होता है','दिल देके देखो','तिसरी मंझिल','लव्ह इन टोकियो','आये दिन बहार के','कटी पतंग' अशा त्यांच्या कितीतरी सिनेमांमुळे आजही त्यांना चाहत्यांची कमी नाहीय. 'लग्न का केलं नाही?' याविषयी त्या म्हणाल्या,''मी तेव्हा लग्न करणार नाही असं काही ठरवलं नव्हतं. मला देखील लग्न करुन संसार करायचा होता,मुलांना जन्म द्यायचा होता पण ते कदाचित माझ्या भाग्यात लिहिलेलंच नव्हतं. जे घडून आलं नाही. पण याची मला मुळीच खंत नाही''.

पुढे त्या म्हणाल्या,''मी तशी मीतभाषी. फारशी स्वतःहून कुणाशी न बोलणारी. त्यामुळे लोकं माझ्याशी बोलताना संकोच करायचे. त्यामुळे बहुधा आपल्या इंडस्ट्रीतही कधी कुणी मला लग्नाची मागणी वगैरे घातली नाही''. याआधी एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की,''त्या एका निर्मात्याच्या प्रेमात पडल्या होत्या. पण जेव्हा त्यांना कळलं की त्याचं लग्न झालंय तेव्हा त्यांनी माघार घेतली होती. ते नातं तोडलं होतं. कारण त्यांना कुणाचं घर तोडायचं नव्हतं''. आशा पारेख आजही काहीवेळा रिअॅलिटी शो मध्ये पाहुण्या परिक्षक म्हणून हजेरी लावताना दिसतात. तेव्हा त्यांच्यातला उत्साह,उमेद सगळ्यांनी पाहिलीच असेल. आजही वयाच्या ८० व्या वर्षी सुंदर,प्रेझेंटेबल राहणं,दिसणं त्यांना कसं काय जमत यावर म्हणाल्या,''सौंदर्य माणसाच्या मनात,विचारांत आहे. जर तुम्ही मनातून,विचारांतून आनंदी असाल तर ते चेहऱ्यावर दिसतं. पण जर तुम्ही मनातून दुःखी असाल तर ते तुमच्या चेहऱ्यावर उमटतं''. आजही आशा पारेख सिनेइंडस्ट्रीत सक्रिय दिसतात. गेल्याचं वर्षी त्यांनी त्यांचा वाढदिवस इंडस्ट्रीतील त्यांची मैत्रिण ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान आणि अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्यासोबत साजरा केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT