Ashish Vidyarthi Wedding Esakal
मनोरंजन

Ashish Vidyarthi Love Story: साठीत नवरदेव झालेल्या आशिष अन् रुपालीची कशी जुळून आली रेशीमगाठ

Vaishali Patil

Ashish Vidyarthi Love Story: बॉलिवूडपासून साऊथपर्यंत आपल्या अभिनय कौशल्याची चुणूक दाखवणारा लोकप्रिय अभिनेता आशिष विद्यार्थी वयाच्या 60 व्या वर्षी दुसरं लग्न केलयं. आसाममधील रुपाली बरुआसोबत त्याने कोर्ट मॅरेज केले.

सध्या सोशल मिडियावर आशिष विद्यार्थी आणि रुपाली बरुआ यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहे. चाहत्यांनी या जोडप्याचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली. तर दुसरीकडे काहींनी त्याला ट्रोलही केलं आहे.

आजकाल आशिष त्याच्या व्हलॉग्सच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांशी जोडलेला आहे. तो बॉलिवूडचा सर्वात मजबुत आणि आवडता खलनायक मानला जातो. आशिषचे लग्न रुपाली बरुआ नावाच्या फॅशन एंटरप्रेन्योरशी झाले आहे. कोर्ट मॅरेजनंतरचे फोटो या कपलने फॅन्ससोबत शेअर केले आहेत.

वृद्ध जोडप्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लग्नाच्या फोटोंमध्ये दोघंही खूप आनंदी दिसत आहेत. दोघांनीही पारंपारिक भारतीय कपडे घातले आहेत. सोनेरी आणि पांढर्‍या रंगाच्या कपड्यांमध्ये हे कपल खूपच प्रेमात दिसत आहे.

लग्नानंतर दोघे रिसेप्शन पार्टीही देणार आहेत. आशिष या लग्नाचे वर्णन एक असामान्य भावना म्हणून करताना दिसला. रुपाली बरुआ आणि आशिष विद्यार्थी यांना जेव्हा विचारण्यात आलं की त्यांची पहिली भेट कशी झाली आणि ते प्रेमात कसे पडले?

तर त्याने सांगितले की ही एक लांबलचक कथा आहे आणि तो त्याबद्दल कधीतरी सांगेन. दुसरीकडे रुपाली बरुआने सांगितले की, ती आणि आशिष विद्यार्थी काही काळापूर्वी भेटले होते आणि त्यांनी त्यांचे नाते पुढे नेण्याचा निर्णय घेतला होता.

रुपाली बरुआ ही आसाममधील गुवाहाटी येथील रहिवासी आहेत. तिचे कोलकात्यात फॅशन स्टोअर आणि स्वतःचा व्यवसाय आहे. रुपाली बरुआने तिच्या दोन मैत्रिणी मेघाली आणि नमिता यांच्यासोबत कोलकातामध्ये नेमग नावाचे बुटीक आणि नरुमेग नावाचे कॅफे उघडले आहे. हे 32 हजार स्क्वेअर फूटमध्ये पसरलेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT