ashish vidyarthi goes honeymoon with wife rupali barua Esakal
मनोरंजन

Ashish Vidyarthi: आशिष विद्यार्थी गेले हनीमूनला! बायकोसोबत फोटो टाकून फसले, झाले ट्रोल

Vaishali Patil

Ashish Vidyarthi And Rupali Barua Latest Photo: बॉलिवूडच नव्हे तर साऊथ चित्रपटातही आपल्या दमदार अभिनय कौशल्याची चुणूक दाखवणारा लोकप्रिय अभिनेता आहे आशिष विद्यार्थी.

पोलिस अधिकाऱ्यांची भुमिका असो किंवा खलनायकाची त्याच्या अभिनयाला तोड नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून आशिष विद्यार्थी त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे.

वयाच्या 57 व्या वर्षी त्यांनी दुसरं लग्न केलयं. आसाममधील रुपाली बरुआसोबत त्याने कोर्ट मॅरेज करत लग्न गाठ बांधली.

सोशल मिडियावर आशिष विद्यार्थी आणि रुपाली बरुआ यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्याला खुप ट्रोल करण्यात आले होते.

मात्र ट्रोलिंगचा त्यांच्यावर फारसा परिणाम झाला नाही. यानंतर दोघेही हनिमूनसाठी सिंगापूरला गेले. आता पुन्हा एकदा हे जोडप त्यांच्या सुट्टी एंजॉय करतांना दिसले.

त्याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. पुन्हा दोघं फिरताना दिसले. हे जोडपे सध्या बालीमध्ये आहे

आशिष विद्यार्थी आणि त्यांची पत्नी रुपाली बरुआ यांनी इंस्टाग्रामवरून हा फोटो शेअर केला ज्यात दोघेही एकत्र वेळ घालवतांना आणि हसतांना त्यांनी हो सेल्फी काढला. इंडोनेशियाला आहे.

आशिष विद्यार्थी आणि रुपाली बरुआ यांनी या फोटोला कॅप्शन दिले आहे, 'Lit in the glory of togetherness'. आता हा फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला आणि नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यात सुरुवात केली.

काहींनी त्याचे कौतुक केले तर काहींनी नेहमीप्रमाणे त्याच्यावर टिका केली.

एका यूजरनं लिहिलं, 'काका तुमची तर मज्जा आहे'. तर दुसऱ्याने याला , 'पॉवर ऑफ मनी.' तर एकानं यूजरने लिहिले आहे की, 'पैसा असेल तर काहीही होऊ शकत नाही.' तर एकानं जोडप्याचं कौतुक करत लिहिलयं की, 'दोघेही खुप खुश दिसत आहे.' तर काहींनी त्यांना हनीमुनच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Mukul Choudhary? लखनौ सुपर जायंट्सचा 'टायगर'! कोलकाता नाइट रायडर्सच्या जबड्यातून विजय खेचून आणणारा नायक...

KKR vs LSG Live: मुकुल चौधरीने KKR च्या हातून मॅच खेचून नेली; लखनौचा रोमहर्षक विजय, IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

Strait of Hormuz: 'होर्मुझ'मधून जायचं असेल तर 'क्रिप्टोकरन्सी' किंवा चिनी 'करन्सी'मध्ये व्यवहार करा! इराणकडून नियमांची यादी

ICC WTC Teams: आयसीसी स्पर्धेत मोठा बदल! आता WTC मध्ये १२ संघांचा समावेश; ३ नव्या संघांना मिळणार संधी, पण कोणत्या?

Government Employee: सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना ३१ मार्च २०२७ पर्यंत स्थगिती; केंद्राचे सर्व राज्यांना निर्देश

SCROLL FOR NEXT