Ashish Vidyarthi Wedding Esakal
मनोरंजन

Ashish Vidyarthi Wedding: बॉलीवूड अभिनेता आशिष विद्यार्थी 'साठी'त चढले बोहल्यावर..म्हणाले,'आयुष्याच्या या वळणावर..'

आसामच्या रुपाली बरुआ हिच्याशी आशिष विद्यार्थी यांनी लग्न केलं आहे.

प्रणाली मोरे

Ashish Vidyarthi Wedding: बॉलीवूडचे फेव्हरेट खलनायक आशिष विद्यार्थी यांनी वयाच्या ६० व्या वर्षी पुन्हा लग्नगाठ बांधली आहे. त्यांनी आसामची रुपाली बरुआ हिच्याशी लग्न केलं आहे.

आशिष यांनी रुपालीशी गुरुवारी २५ मे २०२३ रोजी रजिस्टर पद्धतीनं लग्न केलं. अभिनेत्याचं हे दुसरं लग्न आहे. आशिषनं आपल्या या लग्नावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की,''आयुष्याच्या या टप्प्यावर रुपालीसोबत लग्न एक्स्ट्रा-ऑर्डिनरी फीलिंग आहे''. आशिष आणि रुपाली यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Ashish Vidyarthi Wedding at the age of 60)

गुरुवारी कोलकाता मध्ये झालेल्या या लग्नाला आशिष विद्यार्थी यांच्या कुटुंबातील आणि मित्रपरिवारातील लोक उपस्थित होते. समोर आलेल्या माहितीनुसार लग्नानंतर हे कपल इतर जवळच्या मित्रपरिवारासाठी रीसेप्शन पार्टी आयोजित करणार आहे.

आशिषच्या नववधू विषयी बोलायचं झालं तर ती आसामची राहणारी आहे आणि फॅशन इंडस्ट्रीशी जोडलेली आहे. माहितीनुसार गुवाहाटीची राहणारी रुपाली कोलकाता मध्ये एका फॅशन स्टोअरची मालकीण आहे.

आशिषनं आपल्या लग्नानिमित्तानं प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की,''आयुष्याच्या या वळणावर,रुपालीसोबत लग्न एक वेगळं फिलिंग आहे,जे आनंद देणारं आहे. सकाळी आमचं कोर्ट मॅरेज झालं आणि संध्याकाळी आप्त-स्वकियांसाठी गेट-टूगेदर असेल.

आपल्या लव्हस्टोरी विषयी बोलताना आशिष म्हणाले,''आमची लव्हस्टोरी खूप मोठी कहाणी आहे. पुन्हा कधीतरी सांगेन याविषयी''.

लग्नाविषयी आशिष यांची पत्नी रुपाली म्हणाली,''आम्ही काही दिवस आधीच भेटलो आणि आमच्या नात्याला पुढे न्यायचं ठरवलं. आम्हाला दोघांना हे लग्न खूप साधेपणानं व्हावं असं वाटत होतं''.

रुपाली आधी आशिष यांनी अभिनेत्री राजोशी विद्यार्थी यांच्याशी लग्न केलं होतं. त्या प्रसिद्ध अभिनेत्री,गायिका आणि थिएटर आर्टिस्ट देखील आहेत. आशिष यांच्याविषयी बोलायचं झालं तर त्यांनी ११ हून अधिक भाषांच्या सिनेमातून काम केलं आहे.

गेली अनेक वर्ष आशिष विद्यार्थी इंडस्ट्रीशी जोडलेले आहेत. २०० हून अधिक सिनेमांत ते दिसले आहेत. तामिळ,कन्नड,मल्याळम,इंग्रजी अशा अनेक भाषिक सिनेमांत त्यांनी काम केलं आहे. आशिष विद्यार्थी यांना 'बिच्छू','जिद्दी','अर्जुन पंडित','वास्तव','बादल' सारख्या सिनेमात खलनायक रंगवताना आपण पाहिलं आहे.

काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदाना यांच्या 'गूडबाय' सिनेमात ते दिसले होते. गेल्या काही काळापासून आशिष विद्यार्थी सोशल मीडियावर देखील सक्रिय असलेले पहायला मिळतात आणि फूड ब्लॉगिंग देखील करताना दिसतात.

.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: इस्लामाबाद चर्चा फसली! संतापलेले डोनाल्ड ट्रम्प आता काय करणार? इराणला कडक अल्टीमेटम देत पुढचा प्लॅन सांगितला

MI vs RCB: LORD Shardul मुंबई इंडियन्सच्या मदतीला धावला! चौकार - षटकारांचा पाऊस पाडणाऱ्या फिल सॉल्टचा काढला काटा

Nagpur Student End Life : 'माफ कर, मम्मी, तुझा मुलगा..' , बीसीएत शिकणाऱ्या मुलाने आईला चिट्टी लिहली अन्..., मित्राला फोन करून नको होत ते केलं

Aditi Tatkare Baramati : बारामतीत अदिती तटकरेंचे भावनिक आवाहन; “दादांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न सुनेत्रा ताई पूर्ण करणार"

Pune Cyber Fraud News: अनोळखी लिंकवर क्लिक केल्याने ज्येष्ठ नागरिकाचा मोबाईल हॅक; पावणेआठ लाखांची ऑनलाइन फसवणूक

SCROLL FOR NEXT