Ashok Saraf Shares Memory Of Actress Ranjana . Google
मनोरंजन

'रंजना सारखं कुणीच नाही'; अशोक सराफ डोकावले भूतकाळात...

अशोक सराफ ४ जून,२०२२ रोजी आपला ७५ वा वाढदिवस साजरा करतायत. त्यानिमित्तानं त्यांनी आपली लाडकी मैत्रिण दिवंगत अभिनेत्री रंजना हिच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

प्रणाली मोरे

मराठी सिनेसृष्टीच्या (Marathi film Industry) इतिहासात काही हिरो-हिरोईनच्या जोड्यांना लोकांनी डोक्यावर उचलून धरलं होतं. तो एक काळ या कलाकारांनी एकत्र मिळून गाजवला होता. त्यातीलच एक जोडी म्हणजे अशोक सराफ-रंजना देशमुख. त्या दोघांनी मिळून अनेक सिनेमे केलेत पण त्यातील 'बिनकामाचा नवरा' हा त्यांचा सिनेमा आजच्या पिढीलाही पुरतं वेडं करतो. टि.व्ही वरचा ब्लॉकबस्टर सिनेमा असं म्हटलं तरी चुकीचं ठरू नये. दोघांनी मिळून आपल्या अचूक विनोदी टायमिंगनं तेव्हा चाहत्यांना वेड लावलेच होते पण आजही आजच्या पिढीतले देखील त्यांचे फॅन आहेत बरं का. मी देखील त्यापैकीच एक. वयाची ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं अशोक सराफ(Ashok Saraf) यांनी आपल्या कारकिर्दीवर संवाद साधताना आपली लाडकी मैत्रिण रंजना(Ranjana) हिला आठवत तिच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

अशोक सराफ म्हणाले,''रंजना जेव्हा सिने-इंडस्ट्रीत आली तेव्हा तिनं सुरुवातीला विनोदी सिनेमे किंवा विनोदी भूमिका केल्याच नाहीत. तिनं विनोदी भूमिकांना सुरुवात केली ते माझ्यासोबतच. तेव्हा तिची खूप स्तुती झाली. अनेकांनी म्हटलं देखील विनोदात रंजना अशोकला भारीच पडतेय. पण मी देखील हे ऐकून खूश व्हायचो. कारण ती नटी म्हणून ग्रेट आहे यावर तोपर्यंत मी शिक्कामोर्तब केलं होतं. अशी कोणतीच भूमिका नाही जे रंजनाला जमणार नाही हे तोवर मला कळालं होतं. तिची त्याबाबतीतील जिद्द,हट्ट याविषयी मी पुरता जाणून होतो. त्यामुळे तिचं माझ्यापेक्षा सरस ठरणं यामुळे मला वाईट वाटायचं नाही उलट माझ्या मैत्रिणीसाठी मी आनंदी असायचो. रंजानासारखी त्यावेळी दुसरी नटी कुणीच नव्हती,तिच्यासारखी तिच....इतरही अभिनेत्री नंतर आल्या ज्यांच्यासोबत मी काम केलं,आणि त्या उत्तम होत्या. पण रंजना सारखी रंजनाच. हे सगळं बोलताना अशोक सराफ यांच्या चेहऱ्यावर आपल्या चांगल्या मैत्रिणीला गमावल्याचं दुःख मात्र दिसत होतं. पण तिच्या यशस्वी कारकिर्दीविषयी बोलतानाचा आनंदही तितकाच होता''.

आता तसं पाहिलं तर आजही अशोक सराफ आणि रंजना यांच्यात मैत्री पल्याड काय होतं असा प्रश्न उठला की अनेक गोष्टी बोलल्या जातात. त्यांच्यात प्रेम होतं,ते एकमेकांना पसंत करायचे इतकंच नाही तर आयुष्यात एकत्र पुढे जाण्याचा दोघांनी मिळून घेतलेला निर्णय अन् अचानक यावर काळानं घातलेला घाला त्यात रंजनाचा अपघात अन् एका प्रेमकहाणीचा अंत अशा अनेक ऐकीव गोष्टी आहेत. पण त्या दोघांनाही जवळून ओळखणाऱ्या सूत्रांनी 'हे खरं आहे' असं म्हटलेलं देखील ऐकलंय. आता त्या गोष्टी केवळ आठवणी आहेत. आता जे आहे ते त्यापेक्षाही सुंदर आहे,सत्य आहे. अशोक सराफ-निवेदिता सराफ यांचं प्रेम,त्यांचा दुसऱ्यांना उदाहरण ठरेल असा सुखी संसार..... हॅप्पी बर्थ डे अशोक मामा उर्फ अशोक सराफ....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cough Syrup: नऊ चिमुकल्यांचा मृत्यू पण एकही पोस्टमार्टेम का नाही? कफ सीरप प्रकरणात धक्कादायक खुलासा, नेमकं काय घडलं?

Shakti Cyclone: चक्रीवादळ ‘शक्ती’चा तडाखा बसणार! नेमकं काय आहे हे आणि किती घातक असेल? याचं नाव कुणी ठेवलं? वाचा...

IND vs AUS Full Schedule: भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक ! वाचा कधी, कुठे, केव्हा खेळणार; वेळ व Live Telecast

Madhya Pradesh : मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना दसऱ्यालाच मिळालं दिवळीचं सुपर गिफ्ट; CM यादवांनी शेतकऱ्यांना दिले 653.34 कोटी

मोठी बातमी : भारतीय संघात राहायचा असेल तर... Rohit Sharma, विराट कोहली यांच्यासमोर अजित आगरकरने ठेवली अट

SCROLL FOR NEXT