Aashram 3 Web series Bhopal palace location  esakal
मनोरंजन

Aashram 3: लाखो रुपये खर्च, सजला निराला बाबाचा 'आश्रम', सैफ अलीशी काय आहे कनेक्शन?

ओटीटीवर गेल्या काही दिवसांपासुन प्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या आश्रम वेबसीरिजची मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे.

युगंधर ताजणे

Ashram Web Serise: ओटीटीवर गेल्या काही दिवसांपासुन प्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या आश्रम वेबसीरिजची मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे. (Prakash Jha) नेटकऱ्यांचा तुफान प्रतिसाद या मालिकेला मिळाला आहे. गेल्या दोन्ही सीझनला प्रेक्षकांनी मोठी दाद दिली होती. तिसऱ्या सीझनला देखील निराला (entertainment news) बाबाच्या भक्तांनी पसंती दर्शवली आहे. निरनिराळ्या कारणानं ही मालिका नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय राहिली आहे. बॉबी देओलनं यात बाबा निरालाची मुख्य भूमिका साकारली असून त्याच्यासोबत त्रिधा चौधरी, ईशा गुप्ता यांच्या बोल्ड भूमिकेनं आश्रमचा तिसरा सीझन आणखी रंगतदार झाला आहे.

तिसऱ्या सीझनमध्ये चाहत्यांना अपेक्षित असलेला थरार, रोमान्स पाहायला (Bobby Deol) मिळाला आहे. ओटीटीवरील सर्वाधिक वेळा पाहिली गेलेली मालिका म्हणून आश्रम या मालिकेचा क्रमांक पहिल्या पाच मध्ये येतो. आता ही मालिका आणखी एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आली आहे. तिसऱ्या मालिकेचं (Bollywood News) चित्रिकरण जेव्हा सुरु होतं तेव्हा दिग्दर्शक प्रकाश झा यांना मारहाण झाल्याचे व्हिडिओ समोर आले होते. काही कट्टर धर्मवादी संघटनांनी आश्रमच्या सेटवर गोंधळ घातला होता. ही मालिका एका प्रसिद्ध बाबाच्या आयुष्यावर बेतलेली आहे. अशी चर्चा आहे. त्यामुळे त्या बाबाचे चरित्र मलीन करण्याचा आरोप मालिकेवर करण्यात आला होता.

आश्रम मालिकेतील सुंदर सेटची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. त्यातील निराला बाबाचा जो आश्रम आहे त्याच्याबाबत नेटकऱ्यांना कौतूक आहे. आश्रमच्या तिसऱ्या सीझनची शुटींग ही मध्यप्रदेशातील भोपाळमध्ये झाली. भोपाळमधील अनेक ठिकाणी वेगवेगळे प्रसंग चित्रित करण्यात आले आहे. निराला बाबाचा जो आश्रम दाखवण्यात आला आहे तो भोपाळमध्ये असणारा नस अस सबा पॅलेस आहे. भोपाळ येथील कोफेहिजा स्थित असणारा हा भव्य पॅलेस 18 एकरमध्ये पसरला आहे. 1920 मध्ये पॅलेसची निर्मिती करण्यात आली होती. भोपाळचा शेवटचा नवाब हमीदुल्लाह खान यानं आपली मुलगी आबिदासाठी हा पॅलेस तयार केला.

बऱ्याच लोकांना एक गोष्ट माहिती नाही ती म्हणजे, नवाब हमीदुल्लाह खान हे बॉलीवूडमधला प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान याची आजी बेगम साजिदा सुलतानचे वडिल होते. त्यामुळे आश्रम मालिकेशी सैफ अली खानशी अशाप्रकारे खास नातं असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lohagad Murder Case: ''प्रतिष्ठेसाठी सियाने केतनला ठार मारण्याचा प्लॅन केला'', पोलिस चौकशीत चेतनचा धक्कादायक दावा

Rishabh Pant: 'भाई, कन्फर्म! मी परत येतोय...' DC सोबतच्या ट्रेडनंतर रिषभचा फोन अक्षर पटेलने आधी उचलाच नव्हता अन् मग...

Government Recruitment: मोठी बातमी! आरोग्य विभागात लवकरच पदभरती; पदनिर्मितीचा जीआर निघाला, राज्यात एवढ्या जागा रिक्त

Pune City Yellow Alert : पुणे शहराला ‘यलो’ तर घाटमाथ्याला ‘ऑरेंज’ अलर्ट; पुढील तीन दिवसात पावसाचा जोर वाढणार

Latest Marathi News Live Update: नसरापूर अत्याचार प्रकरणाचा उद्या निकाल

SCROLL FOR NEXT