ashvini mahangade shooting punyashlok ahilyabai holkar movie punjab minister gurmeet singh khudian  SAKAL
मनोरंजन

Ashvini Mahangade: पुण्यश्लोक अहिल्याबाई सिनेमाच्या सेटवर पंजाब कृषी मंत्र्यांची हजेरी, फोटोस व्हायरल

पंजाबचे कृषीमंत्री अश्विनी महांगडेच्या पुण्यश्लोक अहिल्याबाईच्या सेटवर आले होते

Devendra Jadhav

आई कुठे काय करते मधील लोकप्रिय चेहरा अभिनेत्री अश्विनी महांगडेने स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत तिने संभाजी महाराजांच्या बहिणीची म्हणजे राणूअक्का यांची भूमिका साकारली होती.

आता पुन्हा एकदा ऐतिहासिक भूमिका साकारण्यासाठी अश्विनी सज्ज झाली आहे. अश्विनी तिच्या आगामी चित्रपटात अहिल्या बाई होळकर यांची भूमिका साकारणार आहे. 'धर्मरक्षक अहिल्याबाई होळकर' असे या चित्रपटाचे नाव आहे. या सिनेमाच्या सेटवर पंजाबच्या कृषीमंत्र्यांनी भेट दिली.

(ashvini mahangade Punjab Agriculture Minister's presence on the set of punyashlok ahilyabai holkar)

पंजाबचे कृषीमंत्री अहिल्याबाई होळकर सिनेमाच्या सेटवर

"धर्मरक्षक अहिल्याबाई होळकर" या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान मा. श्री. गुरमीत सिंह खुदियान, (कृषि मंत्री, पंजाब) (कृषि और किसान कल्याण विभाग) यांनी सेट ला भेट दिली. तसेच त्यांनी शुभेच्छा व आशीर्वाद दिले. तसेच "धर्मरक्षक अहिल्याबाई होळकर" यांच्या कार्याबद्दल जाणून घेतले. मनपूर्वक धन्यवाद, अशी पोस्ट करत अश्विनीने सर्वांना ही माहिती दिलीय.

अश्विनी अहिल्याबाई होळकरांच्या भुमिकेत झळकणार

काही दिवसांपुर्वी चित्रपटाचे पोस्टर असून अहिल्याबाई होळकर यांच्या रूपात अश्विनी महांगडे दिसते आहे. सोबतच अश्विनीने एक खास कॅप्शनही दिले आहे.

अश्विनी म्हणते, ''इंदूर संस्थानचे संस्थापक, वीर सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन करते. आज अतिशय आनंदाची बातमी माझ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. खुप मोठी जबाबदारी, मनावर दडपण आणि तितकाच आनंद होत आहे.''


''माझी प्रमुख भुमिका असलेला "पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर" या चित्रपटाची आज घोषणा झाली. रसिक मायबाप प्रेक्षकहो याही चित्रपटावर आपण प्रेम करावे. तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. '' अशा शब्दात अश्विनीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

या तारखेला होणार 'धर्मरक्षक अहिल्याबाई होळकर' सिनेमा रिलीज

मराठी मनोरंजन विश्वात अशा मोजक्या अभिनेत्री आहेत ज्या कलाक्षेत्रात सक्रिय आहेतच शिवाय त्या सामाजिक भान सुद्धा जपत असतात. त्यापैकीच एक म्हणजे अश्विनी महांगडे. ती स्वतः 'रायतेचे स्वराज्य' या तिच्या संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्यात सक्रिय असते.

सध्या ती 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) युय मालिकेत 'अनघा' ही भूमिका साकारत आहे. अश्विनी सोशल मीडियावर देखील लोकप्रिय असून, तिच्या कामाचे अनेक चाहते आहेत. सध्या अश्विनीच्या 'धर्मरक्षक अहिल्याबाई होळकर' सिनेमाचं शुटींग सुरु आहे. हा सिनेमा २०२४ ला भेटीला येण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Election: नव्या प्रभाग रचनेमुळे १६ प्रभागांमध्ये गडबड; ६४ नगरसेवकांवर थेट परिणाम; 'या' पक्षांना बसणार फटका

Latest Marathi News Updates: मी मांसाहार केलेला माझ्या पांडुरंगाला चालतो... - सुप्रिया सुळेंचं विधान!

अनधिकृत बांधकामधारकांना उच्च न्यायालयाचा दणका! आता पाच मजली अनधिकृत इमारतीवर बुलडोझर चालणार

विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची शेवटची संधी! सोमवारी जाहीर होतील रिक्त जागा; प्रवेशासाठी २९ व ३० ऑगस्टपर्यंत मुदत, वाचा...

Mumbai Goa Highway: गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांची गर्दी! मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

SCROLL FOR NEXT