ashvini mahangde shared romantic video of boyfriend and explain what is love  SAKAL
मनोरंजन

Ashvini Mahangade: अश्विनीचा बॉयफ्रेंड भलताच रोमँटिक; निऱ्या सावरायला थेट खाली बसला..व्हिडिओ व्हायरल

अश्विनीने एक व्हिडिओ शेअर केलाय ज्यात तिने बॉयफ्रेंडबद्दल प्रेमभावना व्यक्त केल्यात.

Devendra Jadhav

Ashvini Mahangade News: अभिनेत्री अश्विनी महांगडे ही मराठी मनोरंजन विश्वातील चर्चेतली अभिनेत्री. अश्विनीला सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोईंग आहे. आई कुठे काय करते मालिकेमुळे अश्विनीला कमालीची लोकप्रियता मिळाली आहे.

अश्विनीने काहीच महिन्यांपूर्वी तिच्या रिलेशनशिपचा खुलासा केलाय. अश्विनी सध्या निलेश जगदाळेला डेट करत आहे.

या दोघांचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर दिसून येतात. नुकतंच अश्विनीने एक व्हिडिओ शेअर केलाय ज्यात तिने बॉयफ्रेंडबद्दल प्रेमभावना व्यक्त केल्यात.

(ashvini mahangde shared romantic video of boyfriend and explain what is love)

अश्विनीने शेअर केलेला व्हिडिओ आहे एका लग्नातला. त्या लग्नात अश्विनीचा बॉयफ्रेंड खाली झुकत तिचा ड्रेस नीट करताना दिसतोय.

हा एक अत्यंत क्युट व्हिडिओ असून या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झालाय. या व्हिडिओखाली कॅप्शनमध्ये अश्विनी लिहिते.. प्रणवच्या लग्नामध्ये आमच्या रुचिकाने टिपलेले सुंदर क्षण.....

अश्विनी पुढे लिहिते... “प्रेम” या शब्दाला एका भावनेत कैद नाही करता येणार. अनेक सुखं - दुखं: , समाधान, शांती, संकटं, परीक्षा असे एक ना अनेक गोष्टीतून जाण्याचा प्रवास आहे तो.

आलेले कठीण प्रसंग प्रेमाला अधिक आकार देत असतात. त्यातून बाहेर पडता नाही आले तर थोडे थांबा, विसावा घ्यावा आणि परत एकदा तो प्रवास करण्यासाठी सज्ज व्हावे.

अश्विनी पुढे लिहिते.. एक गोड, सुंदर नातं म्हणजे काय? खरे तर खूप लोक यावर छान छान बोलतात. आपण बऱ्याच ठिकाणी “नातं” यावरचे लेख वाचतो.

पण माझ्या मते तो एक अनुभव आहे. हजारो चढ उतार प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात, स्वभाव वेगेवगळे असतात आणि प्रत्येकामध्ये गुण, दोष असतात.

पण कोणत्याही परिस्थितीत आपल्यासोबत कोण आहे यावर त्या व्यक्तींचे नाते ठरते. प्रवास हा प्रत्येकाचा स्वतंत्र असतो पण त्या प्रवासात आपली माणसं सोबत असतील तर तो प्रवास सुखद आणि सोप्पा होतो.

अशा भावना अश्विनीने व्यक्त केल्यात. अश्विनीने तिच्या बॉयफ्रेंड बद्दल इतकं भरभरून लिहिलंय की, सर्वांनी तिचं कौतुक केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT