dayaben will be back on tarak mehta ka ooltah chashmah  sakal
मनोरंजन

तब्बल ५ वर्षांनी 'दयाबेन' परत येतेय.. निर्मात्यांनी केली मोठी घोषणा

'तारक मेहता का उलट चष्मा' या मालिकेमधून तब्बल पाच वर्षे दूर राहिलेली दयाबेन आता परत येणार आहे.

नीलेश अडसूळ

Tarak Mehta ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उलटा चश्मा' हा सध्या टेलीव्हिजन विश्वातील हॉट टॉपिक आहे. (Tarak Mehta ka Ooltah Chashmah) ही मालिका प्रेक्षकांमध्ये सर्वाधिक प्रसिद्ध असून गेली अनेक वर्ष या मालिकेतील कलाकारही घराघरातील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यात यशस्वी ठरले आहे. पण गेल्या काही दिवसांत या मालिकेसंदर्भात चाहत्यांना नाराज करणाऱ्या अनेक गोष्टी कानावर पडत आहेत. काही दिवसांपूर्वी तारक मेहता ही महत्त्वाची भूमिका करणारे शैलेश लोढा मालिकेतून एक्झिट घेत आहेत ही बातमी सर्वत्र पसरली असतानाच आता चाहत्यांमध्य हॉट बबिता म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री मुनमुन दत्ता(Munmun Dutta) या मालिकेला रामराम ठोकत असल्याची बातमी कानावर आली. मालिकेसाठी हे दोन धक्के जबर असतानाच एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

कारण ही बातमीच मोठी आहे. गेली पाच वर्षे सगळे प्रेक्षक ज्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण आता आला आहे. मालिकेतील सर्वाधिक लोकप्रिय पात्र दयाबेन लवकरच परत येणार आहे. याबाबत स्वतः निर्मात्यांनी माहिती दिली असून प्रेक्षक त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मालिकेत दयाबेनची (Daya Ben) भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी (Disha Vakani) जवळपास पाच वर्षांपूर्वी प्रसूती रजेवर गेली होती. मात्र पुन्हा ती मालिकेत परतलीच नाही. निर्मात्यांनी अनेकदा तिला मालिकेत परत येण्याविषयी विचारणा केली होती. पण कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे ती आली नाही.

(asit modi said most favourite character in tarak mehta ka ooltah chashmah dayaben will coming back soon)

पण आता मालिकेत दयाबेनची भूमिका परत येणार असल्याचं कळतंय. खुद्द निर्माते असित कुमार मोदी यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. एका मुलाखतीत ते म्हणाले,'दयाबेन या भूमिकेला मालिकेत पुन्हा न आणण्याचा विचार आम्ही कधी केलाच नाही. मात्र गेल्या काही वर्षांत करोनामुळे आपण सर्वचजण एका कठीण काळातून जात आहोत. पण आता आम्ही दयाबेनला मालिकेत आणण्याचा विचार करत आहोत. त्यामुले प्रेक्षकांना जेठालाल आणि दयाबेन यांच्यातील भन्नाट केमिस्ट्री आणि निखळ मनोरंजन पुन्हा एकदा अनुभवता येईल.”

दयाबेनच्या भूमिकेत अभिनेत्री दिशा वकानीच असतील का यावर ते म्हणाले, 'दयाबेनच्या भूमिकेत दिशा वकानीच परत येईल की नाही हे मला माहित नाही. दिशाजींसोबत आमचे अजूनही खूप चांगले नाते आहे. आम्ही एका कुटुंबासारखे आहोत. पण आता तिचं लग्न झालंय, तिला मूलही आहे आणि प्रत्येकजण आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात व्यग्र झाला आहे. आपल्या सर्वांचं एक खासगी आयुष्य आहे आणि मला त्यावर कोणतीची कमेंट करायची नाही. पण दिशा बेन असो किंवा निशा बेन, तुम्हाला मालिके दयाबेन नक्कीच पहायला मिळणार,' त्यामुळे आता दयाबेन कधी येणार आणि नेमकी दयाबेन कोण असणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Audio Clip: उद्घाटनाच्या कार्यक्रमाला 70 हजार रुपये; हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचा रेट फिक्स! ऑडिओ क्लिप व्हायरल

हृदयद्रावक! ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या संघातील फुटबॉलपटू Diogo Jota चा कार अपघातात मृत्यू, १० दिवसांपूर्वीच झालं होतं लग्न

Thackeray Rally: मुंबईत ५ जुलैला ठाकरे बंधूंची संयुक्त रॅली, तयारीसाठी बैठकांचा सपाटा, पण अजून पोलिसांची परवानगी नाही

Nashik Police Transfers : नाशिक पोलिस उपायुक्तांच्या बदल्या; नवीन नियुक्तीला उशीर का?

‘गुलाबी साडी’ फेम संजू राठोडची मराठी गाणी बॉलिवूडमध्ये झळकणार....

SCROLL FOR NEXT