Asur 2, Asur 2 release date, Asur 2 starcast, Asur 2 full webseries, Asur 2 ott Eskal
मनोरंजन

Asur 3 Series: लोकांचा जीव घेतयं तरी कोण? असुर 2' च्या प्रचंड यशानंतर तिसरा सिझन येणार? अर्शद वारसी म्हणतोय,...

Vaishali Patil

Asur 3 Series: गेल्या काही दिवसांपासून OTT प्लटफॉर्मवर रिलिज झालेल्या Asur 2नं धुमाकूळ घातला आहे. सोशल मिडियावर या सिरिजची प्रचंड क्रेझ पहायला मिळत आहे.

Asur वेब सिरीज Asur-2 चा दुसरा भाग Jio सिनेमावर रिलिज करण्यात आला आहे. त्याचा पहिला सीझन Voot वर रिलीज झाला होता, पण Viacom 18 चे Jio Cinema सोबत विलीन झाल्यानंतर तो Jio Cinema वर रिलीज करण्यात आला.

गेल्या सीझनप्रमाणे या सीझनलाही प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. प्रेक्षकांना सस्पेन्स आणि थ्रिल आवडला. मात्र Asur-2च्या शेवटच्या भागात असं काही घडलं की प्रेक्षकांना या सिरिजच्या तिसऱ्या सिझनची प्रतिक्षा लागली.

Asurचा तिसरा सिझन येणार का असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. त्यातच आता स्वतः अर्शद वारसीने याबाबत एक मोठी हिंट दिली आहे. 'असुर 3' बद्दल त्याने चाहत्यांसोबत एक बातमी दिली.

'असुर 3'बद्दल अर्शद वारसी म्हणाला की, प्रेक्षकांच्या नजरेतून पाहिलं तर या शोचा तिसरा सीझनही त्यांना पाहायचा आहे.

ते म्हणाला, 'मी तूम्हाला एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगू इच्छितो. जेव्हा मी 'असुर 1' केला तेव्हा आम्ही त्याच्या दूसऱ्या सीझन करण्याचा कधीच विचार केला नाही.

पण, जेव्हा मी पूर्ण केले, तेव्हा मी शोच्या लेखकाला म्हणालो, तुला समजलं आहे की हे खूप छान आहे, लोकांना आणखी बघायला आवडेल, आणि असंच घडलं, आम्ही सीझन 2 केला.'

पुढे तो म्हणाला की, जेव्हा आम्ही दूसऱ्या सिझनची शूटिंग करत होतो तेव्हाच मी गौरव (लेखक) ला सांगितलं की आता तू तिसरा भाग लिहायला सुरवात कर.

त्यामुळे मला अशी आशा आहे की त्याने आता तिसऱ्या भागाविषयी विचार केला असेल. कारण स्क्रिप्ट सोपी नाही. खूप वेळ लागतो.

संशोधन. प्रेक्षकांच्या दृष्टिकोनातून मला तिसरा सीझन नक्कीच बघायचा आहे. मला याचा शेवट बघायचा आहे. मला त्याचा अंत बघायचा आहे. मला बघायचे आहे की लोकांचा जीव कोण घेत आहे.

असुरचा पहिला सीझन 2 मार्च 2020 रोजी रिलीज झाला. आता दुसरा सीझन 1 जून 2023 रोजी प्रदर्शित झाला. अर्शद आणि बरुण व्यतिरिक्त यात अनुप्रिया गोएंका, रिद्धी डोगरा, अमेय वाघ यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

मध्यपूर्वेत तणाव वाढला, पुन्हा युद्धाला सुरुवात! अमेरिकेकडून १४० हून अधिक ठिकाणांवर हल्ले, इराणचंही प्रत्युत्तर...

INDW vs ENGW Test: जे सचिन, विराटला नाही जमलं, ते पोरीनं करून दाखवलं! यास्तिका भाटीयाने लॉर्ड्स कसोटीत इतिहास घडवला

Ashadhi Wari Accident Aid: आषाढी वारीतील अपघाती मृत्यू प्रकरणी चंद्रपूरच्या वारकऱ्याच्या वारसांना ४ लाखांची मदत; विठ्ठल रखुमाई वारकरी योजना २०२५ अंतर्गत मंजुरी

Latest Marathi News Update: सटाण्यात रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

SCROLL FOR NEXT