Athiya Shetty-KL Rahul wedding Esakal
मनोरंजन

Athiya-Rahul wedding: अथिया-राहुलच्या लग्नाचा शुभ मुहूर्त ठरला! संगीत कार्यक्रमाचे व्हिडिओ व्हायरल..

Vaishali Patil

बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटर केएल राहुलच्या लग्नाची चर्चा ही गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. आज दोघेही एका इंटिमेट वेडिंग फंक्शनमध्ये लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. त्याच्या मंडप सजला आहे, वधू-वरांचीही सर्व तयारी झाली आहे.

अथिया आणि केएल राहुल हे विवाह बंधनात अडकतील. लग्नाची सर्व तयारीही पूर्ण झाली आहे. दुसरीकडे, लेटेस्ट अपडेट समोर आली आहे. ही जोडी आज दुपारी चार वाजता सात फेऱ्या घेणार आहे. लग्नानंतर संध्याकाळी साडेसहा वाजता हे जोडपे पापाराझींसमोर येतील. त्याचबरोबर या लग्नाला फक्त 100 लोक येणार आहेत.

काल दिवसापासूनच प्री-वेडिंग फंक्शन्स सुरू झाले आहेत. ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अथिया आणि केएल राहुलच्या लग्नात सहभागी होण्यासाठी पाहुणे येण्यास सुरुवात झाली आहे. या लग्नाला फक्त 100 लोक येणार आहेत. त्यापैकी काहींची नावे समोर आली आहेत. सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत. अर्जुन कपूर, पंजाबी गायक गिप्पी ग्रेवाल आणि प्रसिद्ध छायाचित्रकार रोहन श्रेष्ठ यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली आहे.

रात्री म्हणजेच रविवारी अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांचा संगीताचा कार्यक्रम काल झाला. मिळालेल्या माहितीनुसार, या जोडप्याने त्यांच्या लग्नात नो फोन पॉलिसीही ठेवली आहे. त्यामुळे लग्नाला येणाऱ्या पाहुण्याना फोनशिवाय लग्न मंडपात हजेरी लाववी लागणार आहे.

त्याचवेळी संगीत फंक्शनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यात 'हम्मा हुम्मा', 'जुम्मा चुम्मा' सारख्या गाण्यांनी वऱ्हाडी नाचतांना दिसताय. या प्रसंगाचा आणखी एक व्हिडिओ देखील समोर आला आहे ज्यामध्ये 'पठाण' मधील 'बेशरम रंग' देखील वाजताना ऐकू येत आहे. व्हिडिओमध्ये सुनील शेट्टीचा खंडाळा बंगला नववधूसारखा सजलेला दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT