Athiya Shetty-KL Rahul wedding outfits  Instagram
मनोरंजन

Athiya-Rahul नं वेडिंग आऊटफिट्ससाठी 'या' दोन खास रंगांना दिलीय पसंती..डिझायनरचं नावही आलं समोर

अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहून आज अनेक वर्षांच्या आपल्या रिलेशनशीपनंतर लग्नबंधनात अडकणार आहेत.

प्रणाली मोरे

Athiya Shetty-KL Rahul wedding : गेले काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर आज २३ जानेवारी,२०२३ रोजी अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहूल लग्नबंधनात अडकणार आहेत. कुटुंबिय आणि जवळच्या मित्र-परिवाराच्या उपस्थितीत हे कपल लग्नगाठ बांधतील.

सोशल मीडियावर या व्हिआयपी लग्नाच्या अपडेट्स सेकंदा सेकंदाला समोर येत आहेत. आता समोर आलीय माहिती ती आहे कपलच्या लग्नातील आऊटफिट संदर्भात आणि लग्नाच्या मुहूर्ताचा देखील खुलासा झाला आहे.(Athiya Shetty-KL Rahul wedding outfits)

एका इंग्रजी वेबासाईटला मिळालेल्या माहितीनुसार,अथिया शेट्टी आणि केएल राहूल आपल्या लग्नात प्रसिद्ध डिझायनर सब्यासाचीनं डिझाईन केलेले कपडे घालणार आहेत. या खासदिनी या कपलने व्हाइट आणि गोल्डनं रंगाचा वेडिंग ड्रेस फायनल केला आहे. मात्र,आलिया लग्नात लेहेंगा घालणार की साडी हे अद्याप कन्फर्म झालेलं नाही.

लग्नात पाहुणे प्लेट्समध्ये जेवणार नसून,ट्रेडिशनल साऊथ इंडियन स्टाइलमध्ये केळाच्या पानावर जेवणार आहेत. हे कपल आज संध्याकाळी साधारण ४ च्या सुमारास सात फेरे घेतील. एवढंच नाही तर संध्याकाळी जवळपास ६.३० च्या सुमारास मीडियासमोर नवदाम्पत्य बनून हे कपल येईल असं देखील बोललं जात आहे. कपलचं लग्न सुनील शेट्टीच्या खंडाळा येथील बंगल्यावर होत आहे.

रविवारी २२ जानेवारी रोजी अथिया आणि राहूलच्या लग्नाचा मेहेंदी आणि संगीत सोहळा पार पडला,ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर एकापाठोपाठ एक व्हायरल होताना दिसले. या पार्टीत शाहरुख खानच्या 'पठाण' सिनेमातील 'बेशरम गाणं' आणि सलमानचं 'मुझसे शादी करोगी' हे गाणं वाजताना दिसलं. सोहळ्यात सामिल झालेले अनेकजण या गाण्यावर थिरकले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

SCROLL FOR NEXT