athvani marathi movie starring mohan agashe suhas joshi released on 7 july SAKAL
मनोरंजन

Athvani: प्रेम जितकं जुनं होत जातं, तितकं मुरत जातं... 'आठवणी'चे पोस्टर रिलीज

आठवणी सिनेमाचं पोस्टर आज लाँच झालंय.

Devendra Jadhav

Athvani Marathi Movie News: सध्या मराठी मनोरंजन विश्वात अनेक लोकप्रिय सिनेमे आणि विविध धाटणीचे विषय प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

अलीकडच्या काळात वेड, महाराष्ट्र शाहीर, जग्गू अँड ज्युलिएट असे अनेक लोकप्रिय सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले.

असाच एक नाविन्यपूर्ण सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तो म्हणजे आठवणी. आठवणी सिनेमाचं पोस्टर आज लाँच झालंय.

(aathvani marathi movie starring mohan agashe suhas joshi released on 7 july)

कौटुंबिक आणि भावनिक चित्रपटांना मराठी प्रेक्षक नेहमीच भरभरून प्रेम देत आले आहेत. यामुळेच दिग्दर्शक सिद्धांत सावंत आपल्यासमोर असाच एक खास चित्रपट घेऊन सज्ज आहेत.

‘आठवणी’ असे या चित्रपटाचे नाव असून आज (ता. १३) त्याचे पोस्टर रिलीज झाले. या पोस्टरवरून असं लक्षात येतंय की, मराठी प्रेक्षकांसाठी अनेक दिवसांनंतर असा भावनिक आणि नात्यांची गोष्ट सांगणारा चित्रपट येत आहे.

सिद्धांत सावंत यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिलाच चित्रपट असून पोस्टरवरून त्याची प्रगल्भता लक्षात येते. ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी या पोस्टरवर झळकत आहेत,

तर त्यांच्यासोबत प्रमुख भूमिकेत सुहृद वार्डेकर आणि वैष्णवी करमरकर दिसत आहेत. याशिवाय अभिनेता निनाद सावंत साहाय्यक भूमिकेत दिसेल.

नात्यांची गुंतागुंत, एकमेकांवर असलेलं निर्व्याज प्रेम आणि आपल्या जोडीदाराप्रती असलेली ओढ या पोस्टरमधून दिसून येते. त्यामुळे या चित्रपटाचे कथानक नक्की काय असेल हे बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

मिनाश प्रॉडक्शन प्रस्तुत आणि सिद्धांत सावंत व अशोक सावंत निर्मित ‘आठवणी’ हा चित्रपट ७ जुलैला महाराष्ट्रभरात प्रदर्शित होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monorail: मुंबईत चालती मोनोरेल मध्येच अडकली! अग्निशमन दलाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरु

Mumbai Rain: ढगफुटीपेक्षा भयानक पाऊस? हवामान खात्याने दिला धोक्याचा इशारा, ३५० मिमी पाऊस झाला तर काय होईल?

Rahul Gandhi : वोटर अधिकार यात्रेत राहुल गांधींच्या गाडीची पोलीस कर्मचाऱ्याला धडक अन्...; पुढे काय घडलं? वाचा...

Mumbai Train Update: मुंबईतील पावसामुळे लांब पल्ल्याच्या १४ गाड्या रद्द, तर काहींचे वेळापत्रक बदलले, पाहा संपूर्ण लिस्ट

Pune Ganeshotsav : विसर्जन मिरवणुकीच्या मुद्यावर २५ ऑगस्टपर्यंत तोडगा; पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची ग्वाही

SCROLL FOR NEXT