Atif Aslam singer good news baby girl photo viral  esakal
मनोरंजन

Atif Aslam News: गायक अतिफ अस्लमच्या घरी तिसऱ्यांदा गोड बातमी! घरात आली चिमुकली परी, नावंही मोठं गोड

Atif Aslam News: आता अतिफनं इंस्टावर एक पोस्ट शेयर करुन चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. अतिफच्या घरी लहान परीचं आगमन झालं आहे असे अतिफनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

Atif Aslam singer good news baby girl photo viral : अतिफ अस्लमची भलेही ओळख एक पाकिस्तानी गायक अशी असली तरी भारतामध्ये त्याच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. त्याच्या गाण्यांना मिळणारी पसंती मोठी आहे.

गेल्या काही वर्षांपासून अतिफनं त्याच्या गाण्यानं वेगळी ओळख निर्माण केली आहे. अतिफ आणि अरिजित यांच्या लाईव्ह कॉन्सर्टला होणारी गर्दी सोशल मीडियावर चर्चेचा विषय राहिला आहे. (Entertainment News in Marathi)

आता अतिफनं इंस्टावर एक पोस्ट शेयर करुन चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. अतिफच्या घरी लहान परीचं आगमन झालं आहे असे अतिफनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. (Latest Marathi News)

त्याच्या त्या पोस्टवर नेटकऱ्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचे अभिनंदनही केले आहे. मुलीचा पहिला फोटो शेयर करत त्यानं मुलीचं नावही चाहत्यांना सांगून टाकलं आहे.

Also Read - एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

अतिफ अस्लमचा चाहतावर्ग भारतामध्ये मोठा आहे. त्याला सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांमध्ये युवा वर्गाची संख्या अधिक आहे. आपल्या जादुई आवाजानं अतिफनं चाहत्यांना वेडं केलं आहे. त्यानं गायलेल्या बहुतांशी गाण्याला चाहत्यांची मोठी दाद मिळाली आहे.

भारतामध्ये येऊन अतिफनं त्याच्या आवाजानं चाहत्यांच्या मनावर गारुड केलं आहे. यामध्ये काही नेटकऱ्यांनी अतिफला ट्रोलही केले आहे.

अतिफच्या घरी तिसऱ्यांदा गुड न्युज आली आहे. रमजानच्या महिन्यात अतिफच्या घरी आलेल्या गोड बातमीनं त्याला चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. अतिफनं इंस्टावरुन आपल्या लेकीचे फोटो शेयर करत तिच्या नावाचा खुलासाही केला आहे. यावेळी अतिफनं इंस्टावर जी पोस्ट शेयर केली आहे त्यावरुन चाहत्यांनी त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे.

अतिफनं शेयर केलेल्या फोटोंना कॅप्शन देताना म्हटलं आहे की, आता प्रतिक्षा संपली माझ्या लहान परीचे घरी आगमन झाले आहे. ही आम्हा सर्वांसाठी मोठ्या आनंदाची बातमी आहे.

माझी तुम्हा सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे की, तुम्ही सर्वांनी आम्हाला आशीर्वाद द्यावेत. लक्षात ठेवा हलिमा आतिफ अस्लमला तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वादाची गरज आहे. असे अतिफनं म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monorail: मुंबईत चालती मोनोरेल मध्येच अडकली! अग्निशमन दलाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरु

Wagholi News : मैदानातील ३० हजार चौरस फुटाचा पत्र्याचा मंडप अचानक कोसळला; सुदैवाने मंडपात विद्यार्थी नसल्याने जीवित हानी नाही

Mhada Lottery: म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाईन अर्जांचा पाऊस! ५ हजार घरांसाठी ९८७२० अर्ज, 'या' तारखेआधीच भर फॉर्म

Mumbai-Pune Latest Rain Live Updates Maharashtra : पुण्याच्या मध्यवर्ती भागात वाहतूक कोंडी

Mumbai Rain: ढगफुटीपेक्षा भयानक पाऊस? हवामान खात्याने दिला धोक्याचा इशारा, ३५० मिमी पाऊस झाला तर काय होईल?

SCROLL FOR NEXT