Attempt to kill a young man; Actor Vineeth Thattil arrested Google
मनोरंजन

Malayalam अभिनेत्याचा तरुण मुलाला जीवे मारण्याचा प्रयत्न,पोलिसांनी केली अटक

अभिनेता विनीत थात्तिलच्या हल्ल्यात जखमी झालेल्या पीडित व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्रणाली मोरे

दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीशी संबधित एक मोठी बातमी कानावर पडतेय. मल्याळ सिनेमातील अभिनेता विनीत थात्तिलला(Vineeth Thattil) अटक करण्यात आली आहे. अभिनेता विनीत थात्तिल वर खून करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप लावला आहे. आरोप आहे की विनीतने केरळच्या अल्लपुझा इथं राहणाऱ्या एका व्यक्तीचा खून करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या व्यक्तीला अभिनेत्यानं मारण्याचा प्रयत्न केला त्याचं नाव एलेक्स आहे असं म्हटलं जात आहे,सध्या त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.(Attempt to kill a young man; Actor Vineeth Thattil arrested)

मल्याळम सिनेमाच्या अभिनेत्याला पोलिसांनी पकडलं आहे, पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे, ४५ वर्षीय अभिनेता विनीतने एलेक्स नामक व्यक्तीवर हल्ला करत त्याला मारण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्याच आरोपाअतंर्गत अभिनेत्याला अटक करण्यात आली आहे. ही घटना २४ जुलै रोजी घडल्याचं बोललं जात आहे. सध्या हल्ल्यात जखमी झालेल्या पीडित व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एवढंच नाही, तर पोलिसांनी अभिनेत्यावर आयपीसी सेक्शन ३०८ अंतर्गत तक्रार दाखल करुन घेतली आहे.

पोलिसांनी पुढे म्हटलं आहे की, एलेक्सनं आपल्या तक्रारीत सांगितलं की त्याच्यावर विनीतने हल्ला केला आणि मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे की विनितला एलेक्सचे काही थकीत पैसे परत करायचे होते. तेच मागण्यासाठी एलेक्स विनितकडे आला होता. त्याचवेळी त्यांच्यामध्ये मारामारी झाली. विनितनं आरोप केला आहे की, एलेक्सने त्याला मारण्याचा प्रयत्न केला. विनितला या प्रकरणात लवकरच कोर्टासमोर सादर केलं जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT