Avtar the way of water esakal
मनोरंजन

Avatar the way of water: हिंदू देव-देवता 'अवतार'ची प्रेरणा! दिग्दर्शक कॅमेरुनची प्रतिक्रिया

प्रसिद्ध दिग्दर्शक जेम्स कॅमेरुनच्या चित्रपटांविषयी प्रेक्षकांना नेहमीच कुतूहल असते.

सकाळ डिजिटल टीम

Avatar The Way Of Water Director James Cameron : प्रसिद्ध दिग्दर्शक जेम्स कॅमेरुनच्या चित्रपटांविषयी प्रेक्षकांना नेहमीच कुतूहल असते. त्याच्या टायटॅनिक चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. ऑस्कर पुरस्कार जिंकण्याचा आगळा वेगळा विक्रम या चित्रपटाच्या नावावर आहे. सध्या या दिग्दर्शकाचा अवतार द वे ऑफ वॉटर चर्चेत आला आहे.

सोशल मीडियावर अवतारच्या दुसऱ्या भागाची चर्चा सुरु झाली आहे. येत्या महिन्यात हा चित्रपट जगभर प्रदर्शित होणार आहे. त्याची प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता आहे. त्याविषयी वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टीही व्हायरल झाल्या आहेत. एका मुलाखतीमध्ये कॅमेरुन आणि त्याच्या टीमनं आपल्याला या चित्रपटाची प्रेरणा हिंदू संस्कृतीतून मिळाल्याचे म्हटले आहे. अवतारमध्ये पुनर्जन्म दाखवण्यात आला आहे ती गोष्ट हिंदू धर्मातून आल्याचे मेकर्सचे म्हणणे आहे. कॅमेरुन यानं मुलाखतीतून यावर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा - भारतीय उत्पादनांच्या खरेदीतली वाढ बनवेल देशाला आर्थिक महासत्ता...

कॅमेरुनचे म्हणणे आहे की, हिंदू धर्मामधील समृद्धता मोठी आहे. त्यापासून खूप काही शिकण्यासारखे आहे. माझ्या चित्रपटातील कित्येक गोष्टींचा संदर्भ हिंदू धर्म आणि त्यातील देवदेवतांशी आहे. हिंदू धर्मातील पौराणिक कथांमधून मी अवतार साकारला आहे. ६८ वर्षीय आणि मुळ कॅनडा येथे राहणाऱ्या कॅमेरुनच्या अवतारच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. जगभर या चित्रपटानं मोठी कमाई केली होती. त्याचा पहिला भाग हा २००९ मध्ये प्रदर्शित झाला होता.

तब्बल १३ वर्षानंतर त्याचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. बऱ्याच वर्षांपासून अवतारच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहेत. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याचे अॅडव्हान्स बुकींग मोठ्या प्रमाणात झाले आहेत. अवतार द वे ऑफ वॉटरची पहिली झलकही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाली आहे. जगातील सर्वाधिक खर्चिक चित्रपट म्हणूनही अवतारच्या दोन्ही चित्रपटांचे नाव घेतले जाते. त्यातील ग्राफीक्स हे कमालीचे प्रभावी आहेत. एका काल्पनिक विश्वातील हे कथानक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Child Accident : पुण्यात भीषण अपघात! भरधाव कारने ६ दुचाकी, रिक्षाला उडवले; ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

SCROLL FOR NEXT