Avdhoot Gupte New Song From 'Boyz3' Marathi Movie Instagram
मनोरंजन

अवधूतचं गाणं म्हणजे टाळ्या-शिट्टयांची बरसात, 'बॉईज' मधलं 'चांद माथ्यावरी' ऐकलंत?

अवधूत गुप्तेनी महाराष्ट्राला आणि मराठी चित्रपटसृष्टीला एकापेक्षा एक अशी दर्जेदार गाणी दिलेली आहेत.

प्रणाली मोरे

Avdhoot Gupte: बॉईज सिरीजने प्रेक्षकांना जणू वेडच लावले आहे. 'बॉईज ३'(Boyz 3) चित्रपटाची अख्खा महाराष्ट्र वाट पाहत आहे. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात एक मनोरंजनाचा डोस घेऊन पुन्हा एकदा आलीय 'बॉईज ३'ची टीम. 'मनात शिरली', 'मस्त मौला', 'लग्नाळू २.०' ह्या धमाल गाण्यांनंतर आता नुकतेच 'चांद माथ्यावरी' हे प्रमोशनल गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. अवधूत गुप्तेनी महाराष्ट्राला आणि मराठी चित्रपटसृष्टीला एकापेक्षा एक अशी दर्जेदार गाणी दिलेली आहेत.(Avdhoot Gupte New Song From 'Boyz3' Marathi Movie)

अवधूतची गाणी वाजली की टाळ्या, शिट्ट्या वाजल्याच पाहिजे. असाच एक ठेका धरायला लावणार 'चांद माथ्यावरी' हे गाणं प्रदर्शित झाले असून हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीला उतरले आहे. जितेंद्र जोशी यांनी शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला अवधूत गुप्ते यांचा रांगडा आवाज आणि संगीत लाभलेलं आहे. कमाल अश्या हुकस्टेप असणाऱ्या या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन राहुल ठोंबरे आणि संजीव हौलदार यांनी केलेले आहे. सर्व सोशल मिडियावर या गाण्याची चलती पाहायला मिळत आहे.

या गाण्याबद्दल अवधूत गुप्ते म्हणतात," प्रेक्षकांचा मिळणारा तुफान प्रतिसाद मला नेहमीच एक नवी ऊर्जा देतो. 'चांद माथ्यावरी' हे प्रमोशनल गाणं सर्व प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी अशा करतो. 'बॉईज ३' चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक जितके उत्सुक आहेत तितकाच मी सुद्धा प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहण्यासाठी उत्सुक आहे. येत्या १६ सप्टेंबरला चित्रपटगृहात जाऊन 'बॉईज ३' हा चित्रपट नक्की पाहा."

सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत 'बॉईज ३' चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल सखाराम देवरुखकर यांनी केले असून लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. येत्या १६ सप्टेंबर रोजी ‘बॅाईज ३’ चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT