Azma Fallah starts crushing on Prince Narula days after argument Google
मनोरंजन

Lock upp: 'लग्न झालेल्या पुरुषांमध्ये वेगळीच...'; आझमा फलाहची रंगली चर्चा

आझमा फलाहनं प्रिन्स नरुलाविषयी आपलं प्रेम सर्वांसमक्ष व्यक्त केल्यानं भलतीच चर्चा रंगली आहे.

प्रणाली मोरे

कंगना रनौतच्या(Kangana Ranaut) 'लॉकअप'(LockUpp) शो मध्ये नेहमीच काही ना काही वाद पेटलेला दिसत असतो. खासकरुन प्रिन्स नरुला(Prince Narula)च्या येण्यानंतर तर जरा जास्तच गोंधळ माजलेला दिसत आहे. पण याचवेळी शो मधील एक कंटेस्टंट प्रिन्स नरुलाशी भांडता-भांडता चक्क त्याच्या प्रेमात पडलीय. 'लॉकअप' मध्ये सध्या कैदेत असलेली आझमा फलाह(Azma Fallah) पूर्ण जेलमध्ये सध्या फिरुन-फिरुन सगळ्यांसमोर प्रिन्स बद्दलच्या आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहे. आझमा प्रिन्सच्या प्रेमात इतकी वेडी झाली आहे की तिला प्रिन्सचं लग्न झालं आहे याचा काहीच फरक पडत नाही असं ती म्हणालीय. उलट ती म्हणतेय की,''प्रिन्सचं लग्न झालंय म्हणूनच तो मला जास्त आकर्षित करीत आहे''.

'लॉकअप'च्या निर्मात्यांनी ऑल्ट बालाजीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शो संदर्भातले काही व्हिडीओ शेअर केले आहेत. ज्यामध्ये आझमा,प्रिन्सकडेच सारखं पाहताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये मुनव्वर फारुकी,आझमाला विचारत आहे की,''ती इतकी लाजत का आहे?'' ज्यावर आझमा प्रिन्सच्या दिशेने पाहत इशारा करतेय की,''हॅंडसम दिसतोय खूप,माझा क्रश बनला आहे तो. सुरुवातीला चांगला नाही वाटला,पण आता मला आवडायला लागला आहे''.

आझमा मुनव्वरला प्रिन्सच्या जवळ जाण्यासाठी मदत करायला सांगते. पण तेव्हा मुनव्वर म्हणतो,''प्रिन्सचं लग्न झालं आहे,त्याची बायको बाहेर आहे''. ज्यावर आझमा एकदम मजेनं म्हणते कशी,''लग्न झालेल्या माणसांमध्ये एक वेगळंच आकर्षण असतं''. जे ऐकून मुनव्वर हसताना दिसत आहे.

व्हिडीओमध्ये पुढे आझमा,प्रिन्ससोबत फ्लर्ट करताना दिसत आहे. आपल्या प्रेमाची कबुली करताना आझमा म्हणाली,''प्रिन्स तुझ्याविषयी माझ्या मनात प्रेमाची वेगळीच ओढ आहे. तू मला प्रेमात बांधलं नाहीस पण तरीही मला या प्रेमाच्या जाणीवेतून बाहेर पडायचं नाही''. हे ऐकून प्रिन्स आझमाजवळ जातो आणि तिला मिठी मारतो. यानंतर तो तिला म्हणतो,''तु खूप सुंदर दिसतेस''. आझमा हे ऐकून लाजते आणि पूर्ण जेलमध्ये नाचत सुटते. आणि म्हणते कशी,'' हे ऐकून मी मरेनच''.

तिकडे दुसऱ्या व्हिडीओत आझमा जेलमधील कैदी अली मर्चंटसोबत बसलेली पहायला मिळत आहे. यादरम्यान अली तिला विचारतो,''कसा मुलगा हवाय तुला?'' यावर आझमा म्हणते,''ज्याची प्रिन्ससारखी बॉडी असेल,त्याच्या सारखी हेअर स्टाइल असेल आणि उंची. प्रिन्सइतका हॅंडसम नसेल तरी चालेल,अगदी साधारण दिसत असेल तरी मग चालेल मला''.

आपल्या माहितीसाठी सांगतो की 'लॉकअप' चा प्रवास आता फिनालेच्या दिशेने सुरु आहे. आणि आता शो मध्ये अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी कंटेस्टंटमध्ये 'कांटे की टक्कर' सुरु झालेली आहे. शो मध्ये आता प्रिन्स,आझाम व्यतिरिक्त पूनम पांडे,पायल रोहातगी,अली मर्चंट,अंजली अरोरा,सायशा शिंदे, शिवम शर्मा असे कंटेस्टंट राहिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

SCROLL FOR NEXT