Rajkummar Rao & Bhumi Pednekar In 'Badhaai do' Google
मनोरंजन

'बधाई दो' सिनेमाचा ट्रेलर एकदा पहाच;हसून हसून पुरती वाट लागेल

राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर महत्त्वाच्या भूमिकेत...

प्रणाली मोरे

कोरोनानं सर्वजण बेजार झाले आहेत. अशात मनोरंजनासाठी थिएटरचा पर्याय निवडायचा तर तिथे खूप कमी सिनेमे प्रदर्शित होत आहेत. कारण बऱ्याच निर्मात्यांनी कोरोनाच्या नवीन नियमावलीमुळे आपल्या सिनेमांचं प्रदर्शन पुढे ढकललं आहे. काहींनी ओटीटीचा पर्याय निवडून तिथे आपले सिनेमे प्रदर्शित केले. पण राजकुमार राव(Rajkummar Rao) आणि भूमी पेडणेकर(Bhumi Pednekar) यांचा 'बधाई दो' सिनेमा मात्र थिएटरमध्येच प्रदर्शित होणार असल्याचं निर्मात्यांनी जाहिर केलं होतं. आता हा सिनेमा ११ फेब्रुवारीला सिनेमागृहात प्रदर्शित केला जाणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रीलीज करण्यात आला आहे. आणि काही तासातच सोशल मीडियावर या सिनेमाच्या ट्रेलरला चांगलीच पसंती मिळाल्याचं दिसून आले आहे. या सिनेमाता राजकुमार राव पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत तर भूमी पेडणेकर पी.टी टीचरच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे.

या सिनेमाचा ट्रेलर पाहून काही अंदाज मात्र लावले जात आहेत. ते असे की,सिनेमात भूमीनं साकारलेल्या व्यक्तिरेखेला मुलांमध्ये रस नाही आहे. त्यामुळे तिला लग्नच करायच नाहीय. आईवडील खूप मागे लागूनही ती वारंवार लग्नाला विरोध करतेय. पण अशातच तब्बल चार वर्षांपासून तिच्याशी लग्न करण्यासाठी उत्सुक असलेला पोलिस ऑफिसर,जी भूमिका राजकुमार रावने साकारली आहे,तो अखेर तिला लग्नासाठी तयार करतोच. दोघांमध्ये एक गोष्ट संगन मताने ठरवली जाते आणि मग लग्नाचा निर्णय होतो. आता ट्रेलरमध्ये तरी दिसतंय भूमी पेडणेकरने एका लेस्बियन मुलीची व्यक्तीरेखा साकारली आहे. पण इथेही कहानीमध्ये काहीतरी ट्वीस्ट आहे. सिनेमाला छान विनोदी तडका देण्यात आलेला आहे.

या सिनेमाचं दिग्दर्शन हर्षवर्धन कुलकर्णीनं केलं आहे तर विनित जैन यांची निर्मिती आहे. भूमी आणि राजकुमारनं आपल्या सोशल मीडियावर सिनेमाचे पोस्टर-ट्रेलर पोस्ट करून सिनेमासाठी आपण उत्सुक असल्याचं सांगितलं आहे. राजकुमार आणि भूमी दोघंही कसलेले कलाकार आहेत त्यामुळे 'बधाई दो' सिनेमातून त्यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहणं प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी असणार हे मात्र नक्की. हा सिनेमा खरं तर २६ जानेवारीला प्रदर्शित होणार होता. असो,आता ११ फ्रेबुवारीला सिनेमागृहात भेटायला येतोय यापेक्षा आनंदाची दुसरी गोष्ट कोणती असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FSSAI च्या कारवाईचा दणका! Dabur नंतर Zandu सह ५ कंपन्यांवर कडक कारवाई; कारण काय?

Pimpalwandi News : पिंपळवंडी ग्रामस्थांचा पोलीस अधीक्षक गिल यांच्याकडे संतप्त सवाल; पिंपळवंडी येथील पोलीस आऊट पोस्ट दहा वर्षापासून बंद

Shubman Gill: "तो खेळाडू भारतासाठी दीर्घकाळ खेळेल!", श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर गिलची मोठी भविष्यवाणी!

Marathi News Live Updates : पीडीपी नेत्या इल्तिजा मुफ्ती यांनी बिजबेहरा येथील जाबलीपुरा फळ बाजारात फळ उत्पादकांच्या आंदोलनात सहभाग घेतला

Sangola News : सांगोल्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत केला पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT