Badshah tells Nora Fatehi 'pocha lagana' can't be called a hook step Google
मनोरंजन

'जमिनीवर झोपून लादी पुसतेयस?',भर कार्यक्रमात बादशहानं उडवली नोराची खिल्ली

डान्स रिअॅलिटी शो 'डान्स दिवाने ज्युनियर्स' या नव्यानं सुरु झालेल्या शो चं परिक्षण नोरा फतेही,नीतू कपूर,मर्जी पेस्तोनजी करीत आहेत.

प्रणाली मोरे

डान्स रिअॅलिटी शो 'डान्स दिवाने ज्युनियर्स' (Dance Diwane Juniors)काही दिवसांपूर्वीच सुरू झाला आहे. या शो ला भरपूर पसंतीही मिळत आहे. या शो ला नोरा फतेही(Nora Fatehi),नीतू कपूर,मर्जी पेस्तोनजी परिक्षक म्हणून लाभले आहेत. निर्मात्यांनी या शो चा आगामी प्रोमो नुकताच रिलीज केला आहे,ज्यामध्ये रॅपर बादशहा(Badshah) अन् नोरा फतेहची चर्चा रंगली आहे. बादशहाने नोरा फतेहीच्या हूक-अप स्टेपची(Hook Up Step) खिल्ली उडवली आहे आणि चक्क म्हटलं आहे की,''जमीनीवर झोपून लादी पुसायची स्टेप आहे ही''. हे ऐकल्यावर मात्र नोरानं त्याला असं काही चॅलेंज दिलं,जे पूर्ण करता करता बादशहाच्या नाकीनऊ आले.

शो च्या रिलीज झालेल्या प्रोमोत बादशहा नोरा फतेहीच्या हुक-अप स्टेपची खिल्ली उडवताना दिसत आहे. तो म्हणाला आहे,''माझ्या मते जमिनीवर झोपून लादी पुसल्यासारखं करणं म्हणजे काही स्टेप नाही''. हे ऐकून नोरा गप्प झाली. पण तेवढ्यात मर्जी पेस्तोनजी नोराला आणखी डिवचतो आणि म्हणतो,''हे देवा,असं एखाद्या दुश्मनाला पण कुणी म्हणू नये''.

तेव्हा मात्र नोरा फतेहीनं बादशहाला हुक-अप स्टेप करण्याचं चॅलेंज दिलं. ती म्हणाली,''जर माझ्या डान्स स्टेप्स इतक्या सोप्या आहेत तर करून दाखवा. यानंतर नोरा फतेही बादशहाला जबरदस्ती स्टेज वर घेऊन नाचायला भाग पाडते. आणि त्याच्याकडून तिची हुक-अप स्टेप करून घेते. बादशहाकदून नोरानं कुसू,कुसू ते साकी-साकी पर्यंत आपल्या कितीतरी गाण्याच्या हुक अप स्टेप करायला लावल्या.

बादशहा खूप प्रयत्न केल्यानंतर देखील नोराची एकही हुकअप स्टेप करू शकला नाही. आणि मग मात्र त्यानं नोराची चक्क माफी मागितली. त्यानंतर नोरा-बादशहा दोघांनी खूप मजा-मस्ती केली,जी पाहून नीतू कपूर यांना देखील हसू आवरलं नाही. 'डान्स दिवाने ज्युनियर्स' च्या या भागात ही धम्माल प्रेक्षकांना पाहता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Alert: मुंबईत पावसाची रिपरिप सुरूच, पुढील काही दिवस अलर्ट जारी; हवामान विभागाची महत्त्वाची माहिती

आशीष शेलार आमच्या सोबत या! उद्धव ठाकरेंनी केलं शेलारांचे कौतुक, फडणवीसांना ठरवलं पप्पू?

Latest Marathi News Live Update : पुणे-बेंगळुरू महामार्गावर भीषण अपघात

६० व्या वाढदिवसाला शाहरुख मन्नतबाहेर आलाच नाही; पोस्ट करत सांगितलं कारण, म्हणाला, 'माफी मागतो पण...

अर्ध शरीर ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा मदतीसाठी टाहो, बाजूला २० मृतदेह पडलेले; घटनास्थळी हादरवणारं दृश्य

SCROLL FOR NEXT