Rana Daggubati  esakal
मनोरंजन

Rana Daggubati : बाहुबलीच्या भल्लालदेवची बाहेरही दादागिरी! गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

बाहुबली या चित्रपटातून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या राणा दग्गुबाती उर्फ भल्लालदेव हा चांगलाच अडचणीत सापडल्याचे दिसून आले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Rana Daggubati : बाहुबली या चित्रपटातून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या राणा दग्गुबाती उर्फ भल्लालदेव हा चांगलाच अडचणीत सापडल्याचे दिसून आले आहे. तो आणि त्याचे वडील सुरेश बाबू या दोघांवर हैद्रबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. एका उद्योगपतीकडून प्रॉपर्टी हडपण्याचा प्रकार यानिमित्तानं समोर आला आहे.

हैद्राबादचे उद्योगपती प्रदीप कुमार यांनी अभिनेता पिता पुत्र यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार दिली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद कुमार यांचे म्हणणे आहे की, राणा आणि त्यांचे वडील यांनी गुंडांची मदत घेऊन प्रॉपर्टी खाली करण्याची धमकी दिली. २०१४ मध्ये राणा दग्गुबाती, त्याचे वडील आणि प्रमोद कुमार यांनी एकत्रितपणे हॉटेल व्यवसायासाठी भाडेकरारावर घेतले होते. त्यावरुन नवा वाद सुरु झाला आहे. आपल्याला त्या जमिनीवरुन धमक्या आल्याचे कुमार यांनी म्हटले आहे.

Also Read - अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

दग्गुबाती यांचे वडील सुरेश बाबू यांनी ती जमीन विकण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सुरेश बाबू यांनी जमीन खाली करुन देण्यासाठी प्रमोद कुमार यांना पाच कोटी रुपये देखील दिले होते. यानंतर ऐनवेळी प्रमोद यांनी ती जमिन न विकण्याचा घेतल्यानं मोठ्या वादाला सुरुवात झाली होती. तो वाद पोलिस ठाण्यापर्यत गेला.

प्रमोद कुमार यांनी पोलिसांना सांगितलं की, मला कोणाकडूनही पाच कोटी रुपये मिळालेले नाहीत. मला पैसे नाहीच पण धमक्याही मिळाल्या. त्यामुळेच मी पोलिसांकडे धाव घेतल्याचे कुमार यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Amba Ghat Closed : कोल्हापुरातून कोकणात जाणारा आणखी एक मार्ग राहणार बंद, आंबा घाटात गॅस टँकर पलटला

Maharashtra Politics: अर्थखात्यासाठी राष्ट्रवादीची जोरदार लॉबिंग; चार महिन्यांनंतरही निर्णय रखडला, खाते परत मिळवण्यासाठी पक्ष आक्रमक

Indian Railways Hydrogen Train: देशातील पहिला प्रयोग हरियानात! डिझेलविना, प्रदूषणविरहित धावणार हायड्रोजन रेल्वे; रेल्वे मंत्रालयाचा हिरवा कंदील

मोठी बातमी! ग्रामपंचायतींचा नोव्हेंबरअखेर वाजणार बिगुल? सरपंच आरक्षण जाहीर, आता सदस्यांची आरक्षण सोडत १२ जूनला; मतदार यादी ‘या’ महिन्यात होणार अंतिम

येत्या जून महिन्यात बनतोय अत्यंत खतरनाक खप्पर योग ! रातोरात बदलणार नशीब; कुणाला शुभ तर कुणाला अशुभ घ्या जाणून

SCROLL FOR NEXT