baipan bhaari deva marathi movie completes 50 days in theatre kedar shinde vandana gupte SAKAL
मनोरंजन

Baipan Bhaari Deva: बाईपण भारी देवा निमित्ताने केदार शिंदेंच्या आयुष्यात पहिल्यांदाच 'ही' गोष्ट घडली

बाईपण भारी देवा सिनेमाने थिएटरमध्ये ५० दिवस पूर्ण केलेत. त्यानिमित्ताने केदार शिंदेंनी आनंद व्यक्त केलाय.

Devendra Jadhav

Baipan Bhaari Deva News: एखादा मराठी सिनेमा केवळ माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर कसं यश मिळवु शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे बाईपण भारी देवा. बाईपण भारी देवा रिलीज झाल्यावर सिनेमा इतकं यश कमावेल याची कल्पना खुद्द केदार शिंदेंनाही नसेल.

पण सिनेमाने अनपेक्षितपणे यश मिळवलं. आणि आज या यशाची गाडी ५० दिवसांवर आली आहे. त्यामुळे केदार शिंदे आणि सिनेमाच्या संपूर्ण टीमने आनंद साजरा केलाय.

(baipan bhaari deva marathi movie completes 50 days)

बाईपण भारी देवाच्या ५० दिवसांबद्दल केदार शिंदे म्हणतात

"एखाद्या सिनेमाचे ५० दिवस साजरे होण्याची माझी ही पहिलीच वेळ. या सिनेमाला भरभरून प्रतिसाद रसिकांनी दिला.. त्यातही स्त्रियांनी याला एवढं आपलसं मानलं. लक्ष्मी च्या पावलांनी हे पदरात पडलं.", अशी पोस्ट करत केदार शिंदेंनी प्रेक्षकांचे आभार मानले

बाईपण भारी देवा चा नवा रेकॉर्ड

बाईपण भारी देवा सिनेमाचे दिग्दर्शक केदार शिंदे आणि निर्माते JIO STUDIOS ने बाईपण भारी देवा सिनेमाचा लेटेस्ट बॉक्स ऑफीस रिपोर्ट जारी केलाय. यात पहायला मिळतं की, बाईपण भारी देवा सिनेमाने ७६. ०५ कोटींची कमाई केलीय.

२०२३ मध्ये जे मराठी सिनेमे रिलीज झालेत त्या सर्व सिनेमांमध्ये बाईपण भारी देवा सिनेमाची कमाई ऐतिहासीक म्हटली जाईल.

मराठी सिनेमांसाठी निश्चितच हा गौरवाचा क्षण आहे. याशिवाय बॉलिवूडचे गदर 2 आणि OMG 2 हे मोठे सिनेमे समोर असुनही बाईपण भारी देवा चा कमाईचा आकडा वाढत चाललाय.

बाईपण भारी देवाचं बॉलिवूडलाही कौतुक

बाईपण भारी देवा सिनेमाची हवा अजुनही ओसरत नाही. सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड गाजला. इतकंच नव्हे तर महाराष्ट्राबाहेर परदेशातही सिनेमाची खुप हवा झाली. मृणाल ठाकूर, सोनाली बेंद्रे अशा बॉलीवूड सेलिब्रिटींनी सुद्धा बाईपण भारी देवाचं कौतुक केलं.

अशातच बाईपण भारी देवा सिनेमाने बॉक्स ऑफीसवर नवीन इतिहास रचला आहे. बाईपण भारी देवा सिनेमाने ५० दिवस पूर्ण केलेत शिवाय कमाईचा आकडा सुद्धा वाढला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian student shot in USA : अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या!

Rohit Sharma: 'अद्भूत कर्णधार, टीम इंडियाला तू शिकवलंस की...' दिनेश कार्तिकचा रोहितच्या नेतृत्वाला सलाम; पाहा Video

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राच्या वैष्णवी अडकरने जिंकले विजेतेपद; मनिष सुरेशकुमार पुरुष विभागात विजेता

सातारा अन् पालघर जिल्ह्यातील दोन न्यायाधीश सेवेतून बडतर्फ; नेमकं प्रकरण काय?

Phulambri Protest : शेतकऱ्यांच्या मदतीवरून काँग्रेस आक्रमक तहसीलदार व काँग्रेस कार्यकर्त्यांत बाचाबाची

SCROLL FOR NEXT